चिकन व्यवसायाच्या वादातून वयोवृद्ध महिलेला मारहाण, पोलीस कारवाई करत नाहीत, नातेवाईक पोलीस आयुक्तांच्या भेटीला
निक पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचे आरोप करत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे
कल्याण : चिकन व्यवसायाच्या वादातून एका वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याची (Chicken Shop Owner Woman Beaten) घटना कल्याणमध्ये घडली आहे. महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. स्थानिक पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचे आरोप करत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे (Chicken Shop Owner Woman Beaten).
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणाऱ्या मनिषा म्हात्रे यांचे चिकन विक्रीचे दुकान आहे. दुकानात काम करणाऱ्या तरुणाला एका दुसऱ्या चिकन दुकानचालक दीपक म्हात्रेने मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मनिषा म्हात्रे यांना सुद्धा दीपक म्हात्रे आणि विजय म्हात्रे यांनी मारहाण केली. या मारहाणीत मनिषा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
मनिषा म्हात्रे यांची चिकनचे दुकान चांगले चालते. जास्त ग्राहक येतात. याचा राग मनात धरुन चिकनचं दुकान चालवणारा दीपक म्हात्रे आणि विजय म्हात्रे यांनी हल्ला केला आहे, असा आरोप मनिषाचे नातेवाईक प्रतिम दळवी यांनी केला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मोकाट फिरत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आरोपींच्या विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांचं म्हणणे आहे, आम्ही कारवाई योग्य प्रकारे केली आहे. मात्र, पोलिसांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
नवी मुंबईत 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त, 4 जणांना अटक, अंमली विरोधी पथकाची कामगिरीhttps://t.co/jiDamxNCEa#NaviMumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2020
Chicken Shop Owner Woman Beaten
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे कैदी कारागृहाबाहेर, पोलीस असल्याचे भासवून लूट
पनवेलचा कुख्यात डॉन राजा कैकाडीला खंडणीप्रकरणी अटक, मेड इन USA पिस्तूल जप्त
मॉर्निंग वॉक करताना मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने हल्ला; अंबरनाथ हादरले