लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी नाही, दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार?

लहान मुलांना कोरोना लस लसीचा लाभ होणार की नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी नाही, दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार?
पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आला असून ज्यामध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व लक्षणांचा कोरोना विषाणूशी संबंध जोडण्यात आला आहे. इतकंच नाहीतर कोरोनाच्या इतर लक्षणांच्या तुलनेत डोळ्यांशी संबंधित ही लक्षणे शरीरात किती काळ टिकून राहतात हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 6:33 PM

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. जगभरात दररोज कोरोनाग्रस्तांचे आकडे हजाराच्या पटीने वधारत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोरोनावरील लसीही दृष्टीपथात (Corona Vaccine) आहेत. लवकरच भारतातही लसीकरण मोहीम सुरु होण्याचे संकेत आहेत. मात्र लसीकरण चाचणीत लहान मुलांचा सहभाग झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. (children have to wait for coronavirus vaccine says expert no covid vaccine trial over child)

रशियाची स्फुटनिक व्ही, अमेरिकेची फायझर, भारताची कोवॅक्सिन, कोविशील्ड यासह अनेक लसींच्या चाचण्यांना विविध टप्प्यांवर यश मिळत आहे. लसींच्या चाचण्यांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही लसीच्या चाचणीमध्ये मुलांना समाविष्ट केले गेले नाही. त्यामुळे लसीची निर्मिती झाल्यानंतर लहान मुलांना ती दिली जाणार की नाही? जगभरातील लहान मुलांना कोरोना लसीचा लाभ होणार नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लहान मुलांना आणखी प्रतीक्षा?

अमेरिकेच्या अटलांटा येथील एमोरी व्हॅक्सिन सेंटरचे संचालक डॉ. रफी अहमद हे जगप्रसिद्ध इम्युनोलॉजिस्ट आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत लहान मुलांसाठी कोरोनावर कोणतीही लस तयार केलेली नाही. अशा परिस्थितीत मुलांना कोरोना लशीसाठी आणखी काही काळ थांबावं लागू शकतं.

जामिया मिलिया इस्लामिया यांनी आयोजित केलेल्या व्हर्चुअल कार्यक्रमात डॉ. रफी अहमद बोलत होते. कोरोना लस तयार केलेल्या किंवा यशस्वी होण्याच्या मार्गावर असलेल्या कोणत्याही कंपन्यांनी मुलांवर चाचण्या घेतलेल्या नाहीत. कंपन्यांना मुलांसाठीच्या कोरोना लसीची चाचणी मुलांवरच करावी लागेल. त्यात यश मिळाल्यानंतरच ही लस मुलांना दिली जाऊ शकते, असे डॉ. अहमद म्हणतात. (children have to wait for coronavirus vaccine says expert no covid vaccine trial over child)

कोरोना लस किती प्रभावी?

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत ज्या लसी तयार होत आहेत, त्या किती काळ प्रभावी ठरतील, हे निश्चितपणे सांगता येत नसल्याचंही डॉ. अहमद म्हणाले. लसीकरणानंतर त्याचा प्रभाव 3 ते 4 महिने टिकतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यानंतर मानवी शरीराच्या प्रतिकार शक्तीवर खूप काही अवलंबून असते. लस दिल्यानंतर कोरोना रोखण्यासाठी बूस्टर डोसही दिला जाऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

कोरोना लशीनंतर आव्हानं कोणती?

खबरदारी बाळगून खाण्या-पिण्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे, याकडे डॉ. अहमद यांनी लक्ष वेधले. कोणत्याही लसीची चाचणी करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागू शकतो, परंतु कोरोनावरील लस फारच कमी वेळात तयार करण्याचं आव्हान होतं. कोरोना योद्ध्यांना प्राधान्याने लसीकरणा करावे लागेल. यानंतर वृद्ध आणि गंभीर आजारी रुग्णांपर्यंत लस पोहोचली पाहिजे. लस वितरणाच्या मार्गात देशातील लोकसंख्या आणि ग्रामीण वातावरण ही दोन मोठी आव्हाने असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संबंधित बातम्या :

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

(children have to wait for coronavirus vaccine says expert no covid vaccine trial over child)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.