जरा शांततेने घ्या, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनचा पाकिस्तानला सल्ला
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत […]
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.
या एअर स्ट्राईकनंतर जगभरातील विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा कळवळा असलेल्या चीनचीही प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त लू कांग यांनी भारत आणि पाकिस्तानला शांततेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. भारत आणि पाकिस्तान दोघेही दक्षिण आशियातले महत्त्वाचे देश आहेत. त्यांनी संबंध सुधारण्यातच दोन्ही देशांचं हित आहे आणि यामुळेच दक्षिण आशियात शांतता राहू शकेल, असं चीनने म्हटलंय.
एअर स्ट्राईकवर कोणता देश काय म्हणाला?
पुलवामा हल्ला झाल्यानंतर जवळपास 50 पेक्षा जास्त देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं होतं आणि या हल्ल्याचा निषेधही केला होता. इस्रायलने तर आम्ही लागेल ते भारताला विनाअट देऊ, असं म्हटलं होतं. आता एअर स्ट्राईकनंतरही विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियननेही भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन केलंय. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन या देशांनी केलंय.
दुसरीकडे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. जवळपास सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांची एकजूट असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवाय भारताच्या कारवाईबद्दल आपण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना माहिती दिली असल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली.
VIDEO :