Ganesh Chaturthi | नाशिकमध्ये चिनी वस्तूंवर व्यापाऱ्यांसह ग्राहकांचा बहिष्कार, चिनी वस्तू घेण्यास थेट नकार
कोरोनामुळे यंदा नागरिक महागडे वस्तू खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं (Ganesh chaturthi China Products Ban in Nashik) आहे.
नाशिक : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने बाजारात मंदीचं वातावरण आहे. यंदा अनेक चीन वस्तूंना बाजारपेठातून घरचा आहेर देण्यात आला आहे. नाशिकमध्ये चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Ganesh chaturthi China Products Ban in Nashik)
गणेशोत्सवात दरवर्षी सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात चीनी वस्तू बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र यंदा व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील चीन वस्तूंवर बहिष्कार टाकल्याची परिस्थिती नाशिकमध्ये पाहायला मिळते आहे. कोरोनामुळे यंदा नागरिक महागडे वस्तू खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा मात्र अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. गणेशोत्सव ही यंदा कोरोनाच्या संकटात सापडला आहे. मात्र दरवर्षी बाजार मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या चीन वस्तूंना मात्र नागरिकांनी ना पसंत केलं आहे. यंदा चीनी माल बाजारात आलेला नाही.
हेही वाचा – Pune Ganeshotsav 2020 | पुण्यात गणेश मंडळांसाठी कोणते नियम? गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जारी
मात्र गेल्या वर्षीचा 30 ते 40 टक्के माल बाजारात उपलब्ध आहे. तो ही घेण्यास ग्राहक नकार देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या या संकटामुळे यंदा सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक अगदी घरच्या घरी डेकोरेशन तयार करत आहेत. मात्र ही सर्व परिस्थिती बघता कोरोनाचा संकट कधी दूर होईल याकडे सर्वांचेचं लक्ष लागून आहे. (Ganesh chaturthi China Products Ban in Nashik)
मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, 3-4 दिवस आधीच मूर्ती आणण्याचे आवाहनhttps://t.co/hKCRC9IaVV
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2020
संबंधित बातम्या :
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण
पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी