रणगाडे आणि ताफा तैनात, चीन हाँगकाँग आंदोलन चिरडण्याच्या तयारीत?

लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी हाँगकाँगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे, जे आता दिवसेंदिवस तीव्र होतंय. अत्यंत क्रूर पद्धतीने आंदोलन चिरडण्याची पार्श्वभूमी चीनला असल्यामुळे या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

रणगाडे आणि ताफा तैनात, चीन हाँगकाँग आंदोलन चिरडण्याच्या तयारीत?
Follow us
| Updated on: Aug 15, 2019 | 10:02 PM

शेनझेन, हाँगकाँग : चीनच्या लष्कराने शेकडो वाहनं आणि रणगाडे हाँगकाँगच्या (Hong Kong protest) सीमेवर तैनात केले आहेत. हाँगकाँगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेलं आंदोलन (Hong Kong protest) चिरडण्यासाठी हा ताफा तैनात केला असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेनेही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी हाँगकाँगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे, जे आता दिवसेंदिवस तीव्र होतंय. अत्यंत क्रूर पद्धतीने आंदोलन चिरडण्याची पार्श्वभूमी चीनला असल्यामुळे या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

रॉयटरच्या वृत्तानुसार, शेनझेन स्पोर्ट्स स्टेडियमजवळ शेकडो लष्करी वाहनं तैनात आहेत आणि सैनिकांकडून सराव केला जात असल्याचा आवाजाही बाहेर ऐकू येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाच या आंदोलनातून आव्हान दिलं जातंय, ज्यामुळे चीनची दमछाक झाल्याचं चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. चीनने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करावा, असं आवाहन अमेरिकेने केलं होतं.

शेनझेन स्पोर्ट्स स्टेडियमची पार्किंग 100 पेक्षा जास्त लष्करी वाहनांनी भरलेली होती. पण फुटबॉल टूर्नामेंटच्या संरक्षणासाठी ही वाहनं असल्याचा दावा एका पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने रॉयटरच्या पत्रकाराशी बोलताना केला. हाँगकाँगमधील स्थानिकांच्या मते, चीनकडून अशा पद्धतीने लष्करी वाहने आणि कधीही सराव केला जात नाही. पण यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालंय.

हाँगकाँगमध्ये तीन महिन्यांपासून आंदोलन

हाँगकाँगच्या आंदोलकांना चीनमध्ये शिक्षा दिली जाईल, असं विधेयक आणलं आणि त्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. हाँगकाँग हा चीनचाच एक भाग आहे, पण त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जा आहे. या तीव्र आंदोलनानंतर हाँगकाँगच्या प्रशासनाने विधेयक मागे घेतलं, पण आंदोलन संपलं नाही. हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लाम यांनी हे विधेयक अजून अधिकृतपणे मागे घेतलेलं नाही, शिवाय राजीनामा देण्यासही नकार दिलाय, ज्यामुळे आंदोलन तीव्र होत आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी केली जावी

आंदोलनकर्ते चीनच्या ताब्यात देणारं विधेयक तातडीने मागे घ्यावं

मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लाम यांनी राजीनामा द्यावा

लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य मिळावं

हाँगकाँग प्रशासनाने विधानपरिषदेतून काढून टाकलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा परत घ्यावं

चीनकडून बळाचा वापर केला जाईल?

चीनकडून हाँगकाँगमध्ये कोणत्याही क्षणी पीपल्स लिबरेशन आर्मीचा वापर करुन आंदोलन चिरडलं जाऊ शकतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून संयमाने ही परिस्थिती पाहत असलेल्या चीनचा संयम आता सुटला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला चीनने दहशतवादी कृत्य म्हटलं आहे. शिवाय यामागे अमेरिकेचा हात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनकडून हिंसाचार केला जाणार नाही, असंही काही अभ्यासक सांगतात.

1989 चा नरसंहार

चीनला अत्यंत निर्दयीपणे आंदोलन चिरडण्याची परंपरा आहे. राजधानी बीजिंगमधील तायनान्मेन स्क्वेअर (Tiananmen Square massacre) येथे लोकशाहीच्या मागणीसाठी करण्यात आलेलं आंदोलन अत्यंत निर्घृणपणे चिरडण्यात (Tiananmen Square massacre) आलं होतं. चीन सरकारने हे आंदोलन दाबण्यासाठी मार्शल लॉ लागू केला आणि सैन्य बोलावलं. रणगाडे आणि शस्त्रांसह दाखल झालेल्या सैन्याने तायनान्मेन स्क्वेअरला अक्षरशः नरसंहार केला. सैन्याच्या मार्गात आलेल्या विद्यार्थ्यांना रणगाड्याखाली चिरडण्यात आली. यामध्ये शेकडो आंदोलकांचा मृत्यू झाला, तर हजारो आंदोलक जखमी झाले होते. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार 300 जणांचा मृत्यू झाला होता. पण विविध आकडेवारींनुसार दोन ते तीन हजार आंदोलनकर्त्यांना मारण्यात आल्याचं सांगितलं जातं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.