बापरे… अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवली तीन गावं

भारतीय सॅटेलाईटसनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही बाब उघड झाली आहे. | China established three villages on Aruachal Pradesh border

बापरे... अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवली तीन गावं
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 8:39 AM

नवी दिल्ली: लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या खड्या पहाऱ्यामुळे आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर आता चीनने अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आहे. चीन सध्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर जोरदार हालचाली करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनने अरूणचालच्या सीमेवर तीन नवी गावे वसवली आहेत. (China established three villages on Aruachal Pradesh border)

भारतीय सॅटेलाईटसनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही बाब उघड झाली आहे. चीनने बुम ला दर्रा या परिसरापासून काही अंतरावर तीन गावे वसवली आहेत. या भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जातात. चीनने ही तिन्ही गावे आपली असल्याचा दावा केला आहे. तसेच या गावांमध्ये चीनकडून जाणीवपूर्व काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारताकडून यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लडाखमध्ये भारतीय जवानांनी उधळून लावला होता घुसखोरीचा प्रयत्न

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चिनी सैन्य पँगाँग सरोवराच्या परिसरात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. चिनी सैनिकांनी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावत उलट चीनच्या ताब्यातील फिंगर 2 आणि फिंगर 3 या टेकड्यांवर कब्जा मिळवला होता. तर 7 सप्टेंबरला चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांना चिथावण्यासाठी हवेत गोळीबार केला होता.

चीन ‘सुपर सोल्जर्स’ची तुकडी उभारणार? सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट

लडाखसारख्या उंचीवरील आणि दुर्गम प्रदेशात भारताला शह देण्यासाठी आता चीनकडून ‘सुपर सोल्जर्स’ तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी चीनकडून सैनिकांच्या जैविक चाचण्या (biological tests) सुरु असून या माध्यमातून सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवली जाणार आहे.

भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’

चीनकडून सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यारलुंग जंगबो(ब्रह्मपुत्रा ) नदीवर मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणीला आगामी काळात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा भारतीय जल सुरक्षेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये तिबेटी भाषेत यारलुंग जंगबो म्हटलं जाते.

या धरणामुळे भारत आणि बांगलादेशच्या चिंतेत वाढ होऊ शकते. ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन भारत आणि बांग्लादेशातून वाहते. चीननं भारत आणि बांग्लादेशवर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या:

चीनची घुसखोरी थांबेना, मित्र असलेल्या नेपाळमध्येही जमीन लाटली

Special Report | चीनची घुसखोरी नाही, मग जवान का गमावले?- चिदंबरम

मोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव

(China established three villages on Aruachal Pradesh border)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.