चीनने जगातील सर्वात घातक बॉम्ब बनवला!
बीजिंग: अमेरिका आणि रशियानंतर आता चीनने जगातील सर्वात विध्वंसक बॉम्ब बनवल्याचा दावा केला आहे. यापूर्वी अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ आणि रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब्स’ बनवल्याचा दावा केला होता. त्यापेक्षा खतरनाक आणि अत्यंत विध्वंसक हा बॉम्ब असल्याचं चीनचं म्हणणं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचा दावा आहे की अण्वस्त्रांनंतर हा बॉम्ब सर्वात घातक आहे. चीनी बॉम्ब […]
बीजिंग: अमेरिका आणि रशियानंतर आता चीनने जगातील सर्वात विध्वंसक बॉम्ब बनवल्याचा दावा केला आहे. यापूर्वी अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ आणि रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब्स’ बनवल्याचा दावा केला होता. त्यापेक्षा खतरनाक आणि अत्यंत विध्वंसक हा बॉम्ब असल्याचं चीनचं म्हणणं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचा दावा आहे की अण्वस्त्रांनंतर हा बॉम्ब सर्वात घातक आहे. चीनी बॉम्ब हा अमेरिकेच्या बॉम्बपेक्षा छोटा आणि हलका आहे. मात्र यामुळे होणारा विध्वंस हा कमालीचा असेल. चीनने गेल्या वर्षीच हा बॉम्ब एच-6 के या लढाऊ विमानातून टाकला होता. त्यावेळी जमिनीवर कोसळताच अणूचाचणीसारखाच प्रचंड स्फोट झाला होता. चीनी कंपनी नोरिन्कोने आपल्या वेबसाईटवर या बॉम्बच्या चाचणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. नव्या बॉम्बचा विनाशकारी रुद्रावतार पहिल्यांदाज अशा पद्धतीने व्हिडीओद्वारे सार्वजनिक करण्यात आला आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानात आयएसआय दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पहिल्यांदा GBU-43 या अण्वस्त्र विरहित बॉम्बचा वापर केला होता. हा बॉम्ब इतका विनाशकारी होता की याच्या 3 ते साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या पट्ट्यातील सर्वकाही उद्ध्वस्त झालं होतं. यानंतर रशियाने यापेक्षा चारपट जास्त शक्तीशाली बॉम्ब बनवला होता. मात्र आता चीनने त्यापुढे जाऊन सर्वात शक्तीशाली बॉम्ब बनवल्याचा दावा केला आहे.
या बॉम्बमुळे मजबूत इमारती, बुरुज, संरक्षक कठडे यासारखी कोणतीही ठिकाणं वाचू शकणार नाहीत. शत्रूंनी लपण्यासाठी कशाचीही मदत घेतली, तरी ते या बॉम्बपासून वाचू शकत नाहीत, असा चीनचा दावा आहे.