चीनचा भयानक प्लॅन! अमेरिकन नागरिकांचे डीएनए आणि मेडिकल डाटाही गोळा करण्याचं काम सुरु?
चीनकडून सध्या अमेरिकेच्या नागरिकांचा डीएनए आणि मेडिकल डाटा गोळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
बीजिंग : कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात लाखो नागरिकांचे बळी घेतले आहेत. यात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेत अजूनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. त्यातच सध्या अमेरिका आणि चीनमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचपार्श्वभूमीवर चीनचा नवा प्लॅन समोर आला आहे. चीनकडून सध्या अमेरिकेच्या नागरिकांचा डीएनए आणि मेडिकल डाटा गोळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याचाच भाग म्हणून चीन मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील फर्टिलिटी सेंटर (प्रजनन केंद्र) खरेदी करत आहे. यावरुनच अमेरिकेची आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे (China may plan to access DNA and Medical data of US citizens).
चीनच्या या कुरापतींनंतर अमेरिकेच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यानंतर अमेरिकन नागरिकांचा मेडिकल डाटा, डीएनए डिटेल्स गोळा करण्याचा आरोप असलेल्या चिनी कंपन्या अमेरिकेच्या रडारवर आल्या आहेत. नुकतीच चीनकडून मोठ्या प्रमाणात अमेरिकन फर्टिलिटी सेंटरमध्ये होणारी मोठी गुंतवणूक पाहून अमेरिकेच्या संस्था अचंबित आहेत.
चीनचा हा प्लॅन समोर आल्यावर अमेरिकेतील सॅन डियागोमध्ये एका फर्टिलिटी सेंटरमध्ये होणाऱ्या चिनच्या गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या गुंतवणूकदारांनी सॅन डियागो या अमेरिकेच्या मिलट्री भागातील अनेक फर्टिलिटी सेंटरची खरेदी केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून यंत्रणांची चिंता वाढली आहे.
अमेरिकेच्या विशेष समितीकडून चीनच्या संशयास्पद गुंतवणूकदारांवर कारवाई
अमेरिकेत परदेशी गुंतवणुकीवर लक्ष ठेवणाऱ्या सीएफआययूएस समितीने अशा एका संशयास्पद फर्टिलिटी सेंटरवर कारवाई केली होती. ही समिती सामान्यपणे कंपन्यांची खरेदी-विक्री या व्यवहारांवर लक्ष ठेऊन असते. सीएफआययूएस अमेरिकेची एक अंतर्गत समिती आहे. तिचं मुख्य काम अमेरिकेत होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीवर लक्ष ठेवणं हे आहे.
डीएनए आणि मेडिकल डाटाचा उपयोग कोरोनासारख्या आजाराच्या प्रसारासाठी होण्याची शंका
अमेरिकेच्या तपास संस्थांनी चीनकडून अमेरिकन नागरिकांच्या डीएनए आणि मेडिकल डाटाचा उपयोग कोरोनासारख्या इतर भयानक आजाराचा प्रसार करण्यासाठी होऊ शकतो, अशी शंका उपस्थित केली आहे. चीनच्या या कृतीनंतर आता पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती वाढताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :
बायडेन यांच्या प्रचार अभियानाशी संबंधित 3 जणांना कोरोना, कमला हॅरिस ऑनलाईन प्रचार करणार
Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक
“हाय अलर्टवर राहा आणि युद्धाची तयारी करा”, चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा सैन्याला आदेश
संबंधित व्हिडीओ :
China may plan to access DNA and Medical data of US citizens