चीनच्या वस्तूंमुळे अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका : अमेरिका

वॉशिंग्टन : जगातील अनेक देशांमध्ये सुरु असलेला चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा प्रकल्प आर्थिक सहकार्य कमी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका जास्त आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलंय. चीनकडून बीआरआय फोरमचं आयोजन केलं जात असतानाच अमेरिकेकडून हे वक्तव्य आलं आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंध आणखी तणावाचे होण्याची शक्यता […]

चीनच्या वस्तूंमुळे अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका : अमेरिका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

वॉशिंग्टन : जगातील अनेक देशांमध्ये सुरु असलेला चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) हा प्रकल्प आर्थिक सहकार्य कमी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका जास्त आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलंय. चीनकडून बीआरआय फोरमचं आयोजन केलं जात असतानाच अमेरिकेकडून हे वक्तव्य आलं आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंध आणखी तणावाचे होण्याची शक्यता आहे.

चीनच्या बीआरआयला वन बेल्ट वन रोड असंही म्हटलं जातं. अब्जावधी डॉलरच्या या प्रकल्पामुळे आशिया, आफ्रिका, चीन आणि युरोपमध्ये कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य करण्यासाठी मदत होईल, असा चीनचा दावा आहे. पण अमेरिका यावर नाराज आहे. चीनचं हे पाऊल अमेरिका, अमेरिकेचे मित्र आणि सहकाऱ्यांसाठी एक राष्ट्रीय धोका आहे, असा इशाराच पॉम्पियो यांनी दिलाय.

एका कार्यक्रमात बोलताना पॉम्पियो यांनी हे वक्तव्य केलं. विविध मार्गांचं स्वातंत्र्य असल्यामुळे ते दक्षिण चीन समुद्रात पुढे सरकत नाहीत. जगभरात बंदरं बनवण्यामागे त्यांचा उद्देश शिपबिल्डर होणं हा नाही, तर यामुळे विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकाच जास्त आहे, असं पॉम्पियो म्हणाले.

भारताची चिंता काय?

भारत चीनच्या या प्रकल्पाच्या संभावित धोक्यापासून जागरुक आहे. त्यामुळेच चीनला भारतात पाय पसरु दिले जात नाहीत. पण बीआरआयचाच एक भाग असलेल्या चीन-पाकिस्तान इंडस्ट्रियल कोरिडॉरविषयी भारताने अगोदरच चिंता व्यक्त केली आहे. कारण, हा प्रकल्प सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पीओकेमधून जात आहे. या तीन हजार किमी योजनेचा उद्देश चीन आणि पाकिस्तानसाठी रेल्वे, रस्ते, पाईपलाईन आणि ऑप्टिकल फायबर उपलब्ध करुन देणं आहे.

जगातील अनेक देश चीनचा हा संभावित धोका लक्षात घेऊन जागरुक होत असल्याचंही पॉम्पियो म्हणाले. मला असं वाटतं की आशिया, विशेषतः दक्षिण पूर्व आशिया या धोक्यापासून जागरुक होत आहे. त्यामुळेच मला अपेक्षा आहे की परराष्ट्र मंत्रालय चीनला या प्रकल्पांमध्ये सहभागी होणं आणखी कठीण करण्यासाठी मदत करु शकतं, असं पॉम्पियो म्हणाले.

काय आहे बीआरआय?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. चीनने आर्थिक मंदीतून बाहेर येणे, बेरोजगारीवर मात करणे आणि अर्थव्यवस्थेत नवा जीव ओतण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात केली. चीनने आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडात रस्ते, रेल्वे, बंदरे, पाईपलाईन तयार करण्यासाठी आर्थिक प्रकल्प सुरु केला, ज्यात मोठी गुंतवणूक केली जात आहे.

चीनच्या या प्रकल्पातून अनेक छोट्या देशांना नुकसान सहन करावं लागलं आहे. मालदीवला चीनमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबावं लागलं, तर पाकिस्तानचीही तिच परिस्थिती आहे. शिवाय श्रीलंकेत चीनने हंबनटोटा बंदर तयार केलं, पण श्रीलंकेने वेळेवर कर्ज परत न केल्याने चीनने हे बंदर 100 वर्षांसाठी स्वतःच्या ताब्यात घेतलं. चीनच्या याच धोरणाविषयी जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.