कोरोनाबाबत जगाला पहिल्यांदा सावध करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यू
कोरोना विषाणूबाबत पहिल्यांदा जगाला सावध करणाऱ्या चीनी डॉक्टर ली वेनलियान्ग (वय 34 वर्ष) यांचा गुरुवारी मृत्यू झाला.
वुहान : कोरोना विषाणूबाबत पहिल्यांदा जगाला सावध करणाऱ्या चीनी डॉक्टर ली वेनलियान्ग (Dr. Li Wenliang) (वय 34 वर्ष) यांचा गुरुवारी मृत्यू झाला. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, डॉक्टर ली वेनलियान्ग यांचा मृत्यू कोरोना विषाणूची लागण झाल्याने झाला. जेव्हा चीनच्या वुहान शहरात या कोरोना विषाणूची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात होता (Dr. Li Wenliang Dies), तेव्हा डॉक्टर ली वेनलियान्ग यांनी रुग्णालयातून एक व्हिडीओ पोस्ट करत जगाला या जीवघेण्या विषाणूबाबत सावध केलं होतं. या विषाणूबाबत जगाला सावध करणाऱ्या पहिल्या आठ डॉक्टरांमध्ये डॉक्टर ली वेनलियान्ग यांचा समावेश होता (Dr. Li Wenliang Dies).
डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या या व्हिडीओनंतर स्थानिक आरोग्य विभागाकडून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. इतकंच नाही, तर वुहान पोलिसांनी ली वेनलियान्ग यांना नोटीसही जारी केला होता. तसेच, त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, त्यांनीच सावध केल्याने जगाला या विषाणूबाबत माहिती मिळाली.
एका कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने डॉक्टर ली वेनलियान्ग यांनाही या विषाणूची लागण झाली. त्यानंतर 12 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.
डॉक्टर ली वेनलियान्ग यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला एका चॅट ग्रुपमध्ये इतर डॉक्टरांना एक मेसेज केला होता. यामध्ये कोरोना विषाणूच्या धोक्याबाबत त्यांनी इतर डॉक्टरांना माहिती दिली होती. तसेच, या विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घाला, असंही त्यांनी डॉक्टरांना सांगितलं.
Chinese doctor #LiWenliang, one of the eight “whistleblowers” who tried to warn other medics of the coronavirus outbreak but were reprimanded by local police, died from #coronavirus at 2:58 am Friday, the hospital where he received treatment announced. https://t.co/eCrNha7Nn1 pic.twitter.com/WYwDxZFBej
— Global Times (@globaltimesnews) February 6, 2020
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनी डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. “डॉ. ली वेनलियान्ग यांच्या निधनामुळे आम्ही अत्यंत दु:खी आहोत. आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे आभार माणायला हवे”, असं ट्वीट जागतिक आरोग्य संघटनेच्या आधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं. वुहान सरकारनेही डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे.
The #Wuhan government has expressed deep condolences and respect for doctor #LiWenliang, one of the early “whistleblowers” who tried to warn others of the #coronavirus outbreak. https://t.co/eCrNh9QbYr https://t.co/y2K58HUaLB pic.twitter.com/tkx3hB14dd
— Global Times (@globaltimesnews) February 7, 2020
चीनच्या कोरोना विषाणूबाबत भारतही खबरदारी घेत आहे. चीन, जपान, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या जवळपास एक लाख प्रवाशांची थर्मल तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आंतराराष्ट्रीय विमान तळांवर विशेषज्ञ नियुक्त केले आहेत. सध्या देशातील 21 विमान तळांवर थर्मल स्क्रीनिंग सुरु आहे.