Saroj Khan | कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास, रुग्णालयात दाखल
बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Choreographer Saroj Khan Hospitalized) आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना वांद्र्यातील एका रुग्णालयात दाखल केलं आहे. त्या 71 वर्षाच्या आहेत. (Choreographer Saroj Khan Hospitalized)
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र ती निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.
दरम्यान सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत सरोज खान?
सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी 1983 मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली.
मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. (Choreographer Saroj Khan Hospitalized)
संबंधित बातम्या :
Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल