या लोकांशी संबंध नाही, पोस्टर घेणाऱ्यांचा शोध सरकारने घ्यावा, शरजीलच्या फोटोवर शेतकऱ्यांची भूमिका
मागील 15 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : मागील 15 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आंदोलनकारी शेतकऱ्यांनी रेल्वे रोको करण्याचीही घोषणा केली आहे. त्यातच आता भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी शेतकरी आंदोलनाबाबतचा एक फोटो शेअर करत आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. या फोटोत शेतकऱ्यांच्या हातात काही फोटो दिसत आहेत. त्यात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामच्याही फोटोचा समावेश आहे. मात्र, शेतकरी नेत्यांनी अशा कुठल्याही व्यक्तीशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं (Clarification of Farmer leader Rakesh Tikait on poster of Sharjil Imam in Farmer Protest allegation of BJP).
भाजपचे नेते आणि वकील गौरव भाटिया यांनी आपल्या ट्विटरवर एक फोटो ट्विट केला. या फोटोत काही शेतकऱ्यांच्या हातात मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा यांच्यासह उमर खालिद आणि दिल्ली दंगलीचे आरोप असलेल्या शरजील इमाम याचे फोटो दिसत आहेत. तसेच या सर्वांची सुटका करण्याची मागणी केल्याचं दिसत आहे.
यावर भाजप नेते भाटिया म्हणाले, “उमर खालिद आणि शारजील इमाम कधीपासून शेतकरी झाले? आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करु, पण उमर आणि शारजील भारतविरोधी मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासारख्या लोकांची जागा तुरुंगातच आहे.”
या प्रकरणावर भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकेत म्हणाले, “आमचा अशा लोकांशी काहीही संबंध नाही. हे केवळ एक शेतकरी आंदोलन आहे. आमचा शरजील इमाम यांच्यासारख्या लोकांशी कोणताही संबंध नाही. सरकारनेच असं करणारे लोक कोण आहेत हे पाहावं.”
टिकरी बॉर्डरवर पोस्टरबाजीचा अंदाज
भारतीय किसान यूनियन (BKU) एकता उगराहाच्या फेसबुक पेजवर याचा एक व्हिडीओ दिसतो आहे. यात आंदोलनातील शेतकरी आणि महिलांच्या हातात मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा यांच्यासह उमर खालिद आणि दिल्ली दंगलीचे आरोप असलेल्या शरजील इमाम याचे फोटो दिसत आहेत.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार हा व्हिडीओ टिकरी बॉर्डरवरीलच आहे. तेथे बीकेयू एकता उगराहाने 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस साजरा करत संबंधितांच्या सुटकेची मागणी केली. या कार्यक्रमात तुरुंगात बंद असलेल्यांच्या नातेवाईकांनी मंचावर येऊन आपआपल्या कहानी सांगितल्या.
हेही वाचा :
रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार
सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दुपारी 2 वा. महत्वपूर्ण बैठक, आंदोलन अधिक तीव्र होणार!
मोदी सरकारला 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती: धनंजय मुंडे
व्हिडीओ पाहा :
Clarification of Farmer leader Rakesh Tikait on poster of Sharjil Imam in Farmer Protest allegation of BJP