दुष्काळाबाबत अॅक्शन प्लॅन तयार, टँकरवर जीपीएस, सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री

मुंबई :  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी बैठकीची सूत्रं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून ते गडचिरोलीकडे रवाना झाले. या बैठकीत दुष्काळाबाबात झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळाबाबत सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. “मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाचा आढावा घेतला. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळी आढाव्यासाठी आचारसंहितेची अडचण […]

दुष्काळाबाबत अॅक्शन प्लॅन तयार, टँकरवर जीपीएस, सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

मुंबई :  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी बैठकीची सूत्रं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून ते गडचिरोलीकडे रवाना झाले. या बैठकीत दुष्काळाबाबात झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळाबाबत सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

“मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाचा आढावा घेतला. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळी आढाव्यासाठी आचारसंहितेची अडचण नाही. त्या त्या जिल्ह्यातील दुष्काळ आढावा घ्यावा, असे आदेश पालकमंत्र्यांना दिले आहेत”  असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी आढावा घेण्यात आला. दुष्काळी भागाचे पालकमंत्र्यांना दौरे करण्याचे निर्देश देण्यात आले. 12 हजार 116 गावामध्ये 4447 टँकर पुरवले. 1263 चारा छावण्या तैनात आहेत. साडे आठ लाख जनावरांना चारा देण्यात आला. निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे, काही दिवसात परवानगी मिळेल पण त्यापूर्वी आम्ही आढावा घ्यायला सुरुवात केली आहे – मुख्यमंत्री

टँकरवर जीपीएस लावला आहे, त्याबाबतचा आढावा घ्यावा. 2011 ची लोकसंख्या न पकडता 2018 च्या लोकसंख्येनुसार टँकर पुरवावे, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं.

सध्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 72 हजार मजूर काम करत आहेत, त्याबाबतची तयारी झाली आहे. या मजुरांपैकी 91 टक्के मजुरी दिली आहे. स्थलांतर रोखण्याबाबत उपाययोजना सुरु आहेत. शिवाय शालेय पोषण आहार सुट्टीच्या दिवसातही देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अन्नधान्य देणार, अतिरिक्त काही गरज असेल तर तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पाऊस जर आठवडाभर लेट झाला तर अडचण, पण आम्ही त्याबाबत तयारी केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या वातावरणातील उष्णता कमी झाली आहे, त्याचा फायदा होईल. एकूण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अधिकच्या कामासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.