आपण निर्णायक टप्प्यावर, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आपण कोरोना संसर्गाच्या निर्णायक टप्प्यावर असल्याची माहिती दिली. तसेच मला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका, असा सल्लाही दिला आहे (Uddhav Thackeray on Corona Virus).

आपण निर्णायक टप्प्यावर, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 6:04 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आपण कोरोना संसर्गाच्या निर्णायक टप्प्यावर असल्याची माहिती दिली. तसेच मला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका, असा सल्लाही दिला आहे (Uddhav Thackeray on Corona Virus). त्यांनी आज राज्यातील सर्व  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण  कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि  आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे.”

पुढील 15 दिवस गांभीर्याने वागण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा. व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांमध्ये ताकदीने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

“रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचं मार्गदर्शन घ्या”

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले, “ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, विषाणुच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता  याकडे लक्ष द्यावे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्या प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.”

गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

“कामाची विभागणी करा”

मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी  केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही उदधव ठाकरे यांनी केलं.

“अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात”

औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी. जीवनावश्यक वस्तुंची व्याख्या लोकांसाठी आणि यंत्रणेसाठी स्पष्ट करून दिली जावी. राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा साठा आहे. तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत अशांवर पोलीसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

जनजागृती वाढावी- बाळासाहेब थोरात

जनजागृती वाढल्यास या विषाणुविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणुचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.

ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे

राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी मर्यादित स्वरूपात लोक एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करण्याची गरज असल्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले.

जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित राहावा- सुभाष देसाई

सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात, ई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी शासनास सीएसआर अंतर्गत मिळत असलेल्या सहकार्याची माहिती दिली.

प्रभावी प्रशासनाची गरज- मुख्यसचिव

इफेक्टिव्ह पोलीसिंग आणि इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनची गरज मुख्यसचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्रालयात पॉलिसी कंट्रोल रुमची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हास्तरावरही कामाचे आणि जबाबदारीचे वाटप व्हावे. राज्यात 144 कलम लागू झाले आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असेही ते म्हणाले.

कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  प्रत्येक जिल्ह्याने ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे  येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.  ज्या खासगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सुचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असेही ते म्हणाले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,  उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यसचिव अजोय मेहता,  पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग,   बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप

कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा

जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण

Uddhav Thackeray on Corona Virus

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.