मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ (CM Uddhav Thackeray announce shop office close) होत आहे. या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा सुरु करण्याचा सल्ला दिला. पण यानंतरही मुंबईतील गर्दी कमी झालेली दिसत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढील 31 मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ऑफिस आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा (CM Uddhav Thackeray announce shop office close) निर्णय घेतला आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या प्रमुख शहरात कोरोना रुग्णांमध्ये हळू-हळू वाढ होत आहे. त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी या शहरातील सर्व ऑफिस आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, बँक, सार्वजनिक वाहतूक सेवा, किराणा दुकान, भाजीपाला, दूध, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.
कुठे काय चालू राहणार
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकानं बंद राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोनाविषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Let us all come together & win this #WarAgainstVirus
Thank you @RSPicturez & all the artists for this pic.twitter.com/oqBKZm7TcZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2020
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 52 रुग्ण आहेत, मात्र 5 रुग्ण आता व्हायरसमुक्त झाले आहेत. त्यांच्यावर पुढील 14 दिवस देखरेख ठेवली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
ही फिरण्याची सुट्टी नाही, सर्वांनी घरी बसून काळजी घ्यावी. काही लढाया रणांगणात लढाव्या लागतात, आपण घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.