तरुणांनो उद्योग-धंद्याकडे वळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

माझं महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन आहे की त्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी तसंच त्यांनी आता उद्योगधंद्याकडे वळावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तरुणांनो उद्योग-धंद्याकडे वळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 12:16 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात देखील आपण रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला. अनेक कंपन्यांशी करार केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक येतीये. त्यामुळे माझं महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन आहे की त्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी तसंच त्यांनी आता उद्योगधंद्याकडे वळावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Cm Uddhav Thackeray Appeal Youth)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर सभागृहातून शिवसैनिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित केलं. या संबोधनात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सडेतोडपणे आपली मतं व्यक्त केली. महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक येतीये. भूमिपुत्रांना मी आवाहन करतो की, मला इथले तरुण उद्योगधंदे करताना दिसले पाहिजेत, अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.

येत्या काळात नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील. मोठमोठे उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करायला इच्छुक आहेत. मात्र भूमीपुत्रांनी काम करण्याची तयारी ठेवावी. कष्ट करण्याची जिद्द असेल तर स्थानिक तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी तरुणांना विश्वास दिला.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नवीन प्रोजेक्ट येत आहेत. लॉकडाऊनमध्ये देखील आपण काही कंपन्यांशी करार केले आहेत. आता आपला हा प्रयत्न असणार आहे की येत्या काही काळात भूमिपूत्र रोजगारापासून वंचित राहता कामा नये, असं ते म्हणाले. तसंच आपण एक वर्षात काय काम केलं, याचा तपशील लवकरच जनतेसमोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

(Cm Uddhav Thackeray Appeal Youth)

संबंधित बातम्या

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

CM Uddhav Thackeray Speech | कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवला, यापुढे राज्यात मर्द मावळ्यांचं सरकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.