हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन (CM Uddhav Thackeray Criticism on BJP) केले.
मुंबई : हा संकाटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन (CM Uddhav Thackeray Criticism on BJP) केले. मुख्यमंत्र्यांनी आज (24 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray Criticism on BJP).
उद्धव ठाकरे म्हणाले, “हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये. तुम्ही राजकारण केलं तरी आम्ही राजकारण करणार नाही. कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. याशिवाय आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. तुम्ही काहीही बोला. मी प्रामाणिकपणे काम करतोय. माझे सहकारी, माझे मंत्रीमंडळ प्रामाणिकपणे काम करत आहे. महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. कृपा करुन कुणीही यामध्ये राजकारण करु नये”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं.
“केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. काही ठिकाणी आम्हाला उणिवा भासत आहेत, जसे की, जीएसटीचा पैसे अजूनही यायचे आहेत. इतर काही पैसे अडकले आहेत. सुरुवातीला पीपीई किट्स येत नव्हते. औषधांचा तुटवडा जाणवयचा. रेल्वेचे पैसे अजून आले नाहीत. अशा गोष्टी मी जर का बोलायला लागलो तर ही माणुसकी नाही. आता माणुसकी हाच मोठा धर्म आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पॅकेजवरुन मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका
“काहीजण असं विचारतात की, तुम्ही पॅकेज का नाही दिलं? अहो सगळं काही देतो. सर्वात अगोदर जे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकंट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आजपर्यंत खूप पॅकेज वाटलं गेलं. किती पॅकेजेस आली? लाखो कोटींची पॅकेज आली. वरती सगळं फार छान पॅकेज असतं. उघडल्यावर कळतं रिकामा खोका आहे. हे असं पोकळ घोषणा करणारं आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत