Pandharpur Wari | रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत (Uddhav Thackeray going to Pandharpur for Ashadhi Mahapuja).

Pandharpur Wari | रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 4:47 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत (Uddhav Thackeray going to Pandharpur for Ashadhi Mahapuja). त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त महापूजा केली जाईल. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा विठूमाऊलीच्या पुजेसाठी विशेष मान असतो. त्यासाठीच उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील मानाच्या पालख्या देखील पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत. या पालख्यांचे प्रतिनिधी देखील मुख्यमंत्र्यांसोबत या महापुजेत सहभागी होतील.

आषाढी एकादशी महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मंदिरात केवळ 9 मानाच्या पालख्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी अगदी लोकप्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. एकूणच राज्यभरातील कोरोनाचे संकट आता थेट विठ्ठलाच्या दारात येऊन ठेपले आहे. इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची महापुजा अशा पद्धतीने अनेक निर्बंधांसह होत आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका वाखरीत आल्यानंतर त्यांना पंढरपूरात घेऊन येण्यासाठी संत नामदेव महाराज यांच्या पादुका पंढरपूरातून वाखरीत जातात. मात्र, कोरोनामुळे संत नामदेव पादुका यंदा विठाई एसटीतून जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर आगाराने ही विठाई बस आकर्षकपणे सजवली आहे. परंतू ही बस चालवण्याचा मान मुस्लीम समाजातील अरिफ शेख यांना मिळाला आहे. चिठ्ठीच्या माध्यमातून ही निवड झाली आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असलेली बस दिवे घाटाचा टप्पा पार करत सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका देखील पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या बसमध्ये अखंड अभंगवाणी सुरु असून टाळ मृदूंग वाजवत अभंगवाणी सुरु आहे. ज्ञानोबा-तुकोबा असा जपनाम करत पादुका घेऊन जाणारी ही बस पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. कोरोनाच्या सावटामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शासनाने दिलेल्या ‘विठाई’ या एसटी बसने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. मुख्य मंदिरात भजन झाल्यानंतर वारकरी संत तुकोबांच्या पादुका घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालून पादुकांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं.

हेही वाचा :

Pandharpur Wari | टाळ-मृदुंगाचा गजर, माऊलींच्या जयघोषात मानाच्या 9 पालख्या एस.टी बसने मार्गस्थ, काही तासातच पंढरपुरात पोहोचणार

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार, नितीन गडकरींचे पत्र

चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…

Uddhav Thackeray going to Pandharpur for Ashadhi Mahapuja

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.