मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल आहे. (CM Uddhav Thackeray launched the Mahajobs Portal)
http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट दिल्यानंतर तरुणांना रोजगाराच्या संधींविषयी माहिती मिळणार आहे.
राज्यातील उद्योगात मराठी मुलांना नोकरी मिळावी, हा या पोर्टलचा उद्देश असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. कंपन्यांना कशा प्रकारचे कामगार हवेत याची माहिती कंपनी कामगार विभागाला कळवेल. मग त्यानुसार महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना नोकरी मिळेल.
हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
कंपन्यांनी स्थानिकांना नोकऱ्या द्याव्या, हा ‘महाजॉब्स पोर्टल’ मागचा प्रयत्न आहे. यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक असेल, नोकरीत रुजू होताना हे प्रमाणपत्र देता येईल. तरुणांनी नोंदणी करावी आणि नोकऱ्या मिळवाव्या. एमआयीडसी त्याचा पाठपुरावा करेल. असेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
#MissionBeginAgain मध्ये सुरू झालेल्या ६४ हजार उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी देण्यासाठीचे ऐतिहासिक पाऊल – #महाजॉब्स पोर्टल#magneticmaharashtra #madeforbusiness @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @midc_india @CIIEvents @MCCIA_Pune @ficci_india @NCPspeaks @INCMaharashtra pic.twitter.com/RV5loPGrOC (CM Uddhav Thackeray launched the Mahajobs Portal)
— Subhash Desai (@Subhash_Desai) July 6, 2020
दरम्यान, नगरसेवकांच्या बाबतीत महाविकास आघाडीचे नेते लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विरोधकांना आरोप करण्यापलिकडे कोणतेही काम नाही, असे उत्तर सुभाष देसाई यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे (https://t.co/qfyJ5HHkPS) ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.#MahaJobPortal pic.twitter.com/JjBdBLDLvb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2020