एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव न होता परीक्षा घ्या, कुलगुरुंच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत (University Final year exam decision) आहेत.

एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव न होता परीक्षा घ्या, कुलगुरुंच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 6:38 PM

मुंबई : “कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्या (University Final year exam decision) आहेत. कोरोनाचा एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करुन विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपवली पाहिजे. त्या दृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व विद्यापीठ कुलगुरुंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. (CM Meet With University VC Final year exam decision)

अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची त्याशिवाय श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरु यांची बैठक 12.30 वाजता सुरु (University Final year exam decision) झाली. जवळपास दोन तास  ही बैठक सुरु होती. या बैठकीला उच्चशिक्षण संचालक तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील सर्व प्रधान सचिवही उपस्थित आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक उपस्थित आहेत.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच गोष्टी पुढे गेल्या आहेत. अगदी आर्थिक वर्ष पुढे गेले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत. पण आता परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळावा लागणार आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्चिततेची भिती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे.”

“तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करायला हवा. नव्याने समीकरण जुळविण्याचे वेळ आली आहे. अनेक हुशार विद्यार्थी परीक्षा वेळेवर होऊ शकलेल्या नाहीत म्हणून चिंतेत आहेत. त्यामुळे पर्यांयाचा आणि नेमक्या पद्धतीचा विचार करू. एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा घेऊ. सरासरी गुण किंवा श्रेणी आणि रोजगार किंवा उच्च शिक्षणासाठी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गुण/श्रेणी मिळविण्यासाठी परीक्षा देण्याची ऐच्छिक सुविधा यांसह विविध पर्यांय कायदेशीर तसेच त्यातील प्रत्यक्ष कार्यवाहीची पद्धती पडताळून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

कुलगुरूंच्या बैठकीत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

1.  एकाही विद्यार्थ्याला प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन परीक्षा घेऊ.

2. सरासरी गुण किंवा श्रेणी आणि रोजगार किंवा

3. उच्च शिक्षणासाठी किंवा पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुण/श्रेणी मिळविण्यासाठी

4. परीक्षा देण्याची ऐच्छिक सुविधांसह विविध पर्यांय कायदेशीर

5.  त्यातील प्रत्यक्ष कार्यवाहीची पद्धती पडताळून पाहण्याची सूचना

6. परीक्षेबाबत पर्यायांची पडताळणी करा

7.  विद्यार्थी,पालकांसमोरील चिंता संपवा

8. जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही हे स्पष्ट

9.आपल्याकडे मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परस्थितीही सतत बदलते

10.तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करायला हवा

कोरोना डोळे उघणारा व्हायरस

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत एकंदर शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे निर्देश दिले. रदेशात ज्या पद्धतीने शिक्षण चालते. खास करून विद्यापीठांमध्ये कसे शिकवले जाते. त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याकडे पदवी घेतल्यानंतरही हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यामुळे त्याठिकाणची शिक्षण पद्धती आपल्याकडे कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील.

“कोरोना डोळे उघणारा व्हायरस म्हटले पाहिजे. आरोग्य सुविधांना जितकी प्राधान्य देण्याची गरज आहे. तसेच शिक्षणाकडेही जीवनावश्यक म्हणून पहावे लागेल. महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जामध्ये सगळीकडे समानता असायला पाहिजे. शिक्षण सुलभ कसे करता आले पाहिजे यावर जोर द्यावे लागेल. ग्रामीण भागातील गुणी विद्यार्थ्याला परिस्थितीमुळे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकता आले नाही म्हणून अन्याय होऊ नये. अशी व्यवस्था तयार करायला हवी. शिक्षणाचा दर्जा उंचावून त्याला संधी द्यायला हवी. साक्षरतेचे प्रमाण कसे वाढविता येईल, त्या दृष्टीने पाऊले टाकावी लागतील. आदिवासीपर्यंतही शिक्षणाच्या चांगल्या सुविधा पोहचविता आल्या पाहिजेत. शिक्षणाचा दर्जा उंचावून तो एक समान असायला हवा. तो सर्वोत्तमच असायला हवा. माझा महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

“यापुढेही अशी संकट येऊ शकतील. त्याचा विचार करून शिक्षण, उद्योग, आणि कार्यालये सुरु राहतील अशी पद्धती विकसित करावी. जग थांबता कामा नये. आपल्याकडे सुविधा पुर्ण असायला हव्याच. त्यासाठी उत्तम कनेट्क्टिव्ह्टी वाढविता येईल का याचा विचार करावा. शिक्षण हे जीवनावश्यक आहे. आपली मुले शिकत राहिली पाहिजेत. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण सुलभतेने घरच्या घरी कसे दिले जाईल. त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्लास रूम्स अशा पर्यांयाचही विचार करावा,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात सरकारने नेमलेल्या कुलगुरुंच्या समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. कुलगुरूंच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार सद्यस्थितीत परीक्षा घेणे धोक्याचे आहे. त्यामुळे त्या रद्द करण्यात याव्यात, अशी शिफारस करण्यात आली होती.

मात्र काही ठराविक कुलगुरु आणि अभाविप ही विद्यार्थी संघटना राज्यात परीक्षा घ्या, याचा आग्रह करत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीत  मुख्यमंत्री सर्व कुलगुरुंकडून परीक्षा संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेणार आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बोललं जात आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, उदय सामंताचं युजीसीला पत्र

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे “यंदाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा. ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या,” असं पत्र उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) दिलं  होतं.

“विद्यार्थ्यांची असुरक्षितता मनावरील ताण पाहून महाराष्ट्र शासन युजीसीकडे परवानगी मागत आहे की, आम्हाला या परीक्षा घ्यायच्या नाहीत. या परीक्षा घेत नसताना कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीची गुणांची सिस्टीम विद्यापीठाने अमलात आणावी,” असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.

सरासरी गुण देऊन निकाल लावा, विद्यार्थी संघटनांची मागणी

तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांमुळे सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती.

त्यामुळे मुख्यमंत्री आणि कुलगुरुंसोबत आज होणाऱ्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागून राहिले (University Final year exam decision) आहे.

संबंधित बातम्या : 

सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा, विद्यार्थी संघटनेची मागणी

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी द्या, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांचे यूजीसीला पत्र

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.