रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (5 जून) पाहणी (CM Uddhav Thackeray to Visit Raigad) करतील.

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे
या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 2:53 PM

मुंबई/ रायगड : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज (5 जून) पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन, रायगड जिल्ह्याला तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंचनामे होतील पण तूर्तास तातडीची मदत म्हणून ही रक्कम देत आहे, इतर जिल्ह्यांनाही मदत केली जाईल, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, सध्या तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपये देण्यात येतील. अर्थातच ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हे रोरो बोटीने मुंबईवरुन अलिबागला रवाना झाले. या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. (CM Uddhav Thackeray to Visit Raigad)

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. तसेच पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. याशिवाय वटपौर्णिमादेखील आहे. योगायोग विचित्र आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमध्ये वेगळ्या कारणामुळे यावं लागलं. याच दिवशी पर्यावरणाचा जो काही ऱ्हास झाला आहे, वृक्षांची जी पडझड झाली आहे, ते दिसलं.

दोन दिवसांपूर्वी निसर्गाचं रौद्र रुप आपण पाहिलं. रायगडकरांनी प्रत्यक्ष ते रौद्र रुप अनुभवलं. प्रसारमाध्यमातून संपूर्ण जगाने पाहिले. ते दृश्य अत्यंत भयानक आणि भीतीदायक होते. अशा परिस्थितीत रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. विशेष म्हणजे इथल्या लोकांचं कौतुक करण्यासाठी मी आलेलो आहे. या संकंटात जनता, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, एसडीआरएफ यांनी प्रखर झुंज दिली.

सर्वजण श्वास रोखून टीव्हीवर वादळ बघत होते. आपल्याकडे हे वादळ येत नाही ना? अशी भीती अनेकांच्या मनात होती. हजारो लोक श्वास रोखून टीव्हीवर वादळ बघत असताना रायगडमधील नागरिक, प्रशासन या वादळाला तोंड देत होती.

एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे, जेव्हा अशी आपत्ती येते तेव्हा जिवितहानी होऊ न देणं हे प्रशासनाचं कर्तव्य असतं. वादळात सहा जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. मदत म्हणून पैसे देता येतात. मात्र, घरातली व्यक्ती गेली तर ती परत येत नाही.

रायगड आणि वादळ, इतिहास जर बघितला तर अनेक वादळ ज्यांनी पचवले त्या शिवरायांची ही राजधानी आहे. वादळ पचवणं हे रायगडाला नवीन नाही, पण हे असं वादळ बऱ्याच वर्षांनंतर आलं होतं. जवळपास शंभर वर्षांनी ते आलं. अत्यंत रौद्र असं ते वादळ होतं.

विजेचे खांब, मोबाईलची आजही सुविधा सुरु झालेली नाही. वीज प्रवाह खंडीत आहे. झाडं उलमडून पडली आहेत. शेतीचं नुकसान झालं आहे. बागायतदारांचं, घरांचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची ताबडतोब सुरुवात करण्यात आली आहे. आदेश काल किंवा परवा दिले असले तरी प्रशासनाने त्याअगोदरच काम करायला सुरुवात केली आहे. आपण जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित करुन सुरक्षित ठेवलं आहे. हे सुरक्षित ठेवण्याचं प्रमाण फक्त रायगड नसून मुंबई, पालघरपासून संधुदुर्ग पर्यंतच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यात आपल्याला यशदेखील आलं आहे.

रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची मदत

पॅकेज हा शब्द घासला, पुसला गेला आहे. प्रत्येक वेळेला पॅकेज जाहीर केल्यानंतर किती अंशी येतं किंवा नाही येत याची मला कल्पना नाही, पण तातडीने ज काही करता येईल त्याला सुरुवात केलेली आहे. पंचनामे पूर्ण व्हायला आठ ते दहा दिवस लागतील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई, बांधकामासाठी पैसे लागतील, त्या पैशांची सोय करायची आहे, ते शासन करेलच. पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून 100 कोटी रुपये देत आहोत. याचा अर्थ असा नाही की, 100 कोटीच रुपये मिळतील, पण एक अंदाजानुसार ही रक्कम देत आहोत. कुठलेतरी वारेमाप जाहीर करायचं, हे मला नकोय. जे काय आहे, ते प्रत्यक्ष कामात यायला हवं. त्याच दृष्टीकोणाने मी ही मदत दिली आहे.

LIVE UPDATE 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे मुद्दे

  • यानंतर कोरोना संकट आहे. त्यामुळं स्वच्छता करावी नाहीतर पुन्हा दुसरा आजार होईल, विज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी बाहेरुन पथक पाठवणार. प्रशासन दक्ष आहे, लवकर सर्व जिल्हे पुर्ववत होतील – मुख्यमंत्री
  • रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहे, इतर प्रभावित जिल्ह्यांनाही आर्थिक मदत देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • रायगड आणि वादळ, शिवरायांची ही भूमी आहे, वादळं पचवणं हे रायगडसाठी नवं नाही, पण आजची स्थिती वेगळी, पंचनामे होत आहेत, लोकांना स्थलांतरित करुन सुरक्षित ठेवलं, जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आलं – मुख्यमंत्री 
  • LIVETV – जागतिक पर्यावरण दिन, वटपौर्णिमा आहे. पर्यावरण दिनीच रायगडमध्ये निसर्गाचं रौद्ररुप पाहिलं, मी पाहिलं पण रायगडकरांनी अनुभवलं, ती दृश्ये भयानक आणि भीतीदायक होती, रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे – मुख्यमंत्री  
  • आपत्ती काळात जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली,
  • हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार .
  • कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे,
  • प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल,
  • आज मी आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे,
  • संकट सर्वांसाठी असते,पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.
  • घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार.
  • मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्द्ल शासन मदत देणार.

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक ” date=”05/06/2020,2:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, रायगड जिल्ह्यातील थळ गावात पाहणीला सुरुवात https://t.co/ImprYhMJl7 #CMUddhavThackeray pic.twitter.com/kGY5rz6f32

— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2020

[svt-event title=”मुख्यमंत्री अलिबागमध्ये तर उपमुख्यमंत्री पुण्यातील नारायणगावात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी” date=”05/06/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

असा असेल मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

सकाळी 11.30 – गोल्डन गेटने रो-रो बोटीतुन मांडवा जेटीकडे प्रयाण दुपारी 12.30 – मांडवा जेटी ता. अलिबाग येथे आगमन 12.35 – मोटारीने थळ ता. अलिबागकडे प्रयाण 12.50 – थळ ता. अलिबाग येथे आगमन व निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी 1.20 – मोटारीने थळ ता. अलिबाग येथून अलिबागकडे प्रयाण 1.35 – अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथे आगमन 1.35 – अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी 1.40 – मोटारींने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागकडे प्रयाण 1.50 – निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक 3.15 – रो- रो बोटीने ॲारेंज गेटकडे प्रयाण सायंकाळी 4.15 – ॲारेंज गेट येथे आगमन

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा : मुख्यमंत्री

निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे याबाबत आढावा घेतला होता. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray to Visit Raigad)  दिल्या.

संबंधित बातम्या : 

Cyclone Nisarga | मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला, नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा

राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.