‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी (CM Uddhav Thackeray Visit Raigad) केली.
तसेच मुख्यमंत्र्यांनी इतर प्रभावित जिल्ह्यांनाही आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले.
Follow us
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख हे रोरो बोटीद्वारे अलिबागला रवाना झाले.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अलिबागमधील थळ या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक
मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
तसेच मुख्यमंत्र्यांनी इतर प्रभावित जिल्ह्यांनाही आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले.
अलिबागमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणीचे काही फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अलिबागमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी