हिंगणघाट जळीतकांड : फाशीच्या अंमलबजावणीला वेळ लागू देणार नाही : उद्धव ठाकरे
हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला लवकरत लवकर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला लवकरत लवकर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला. (CM Uddhav Thackeray on Hinganghat Burn Victim Teacher Death ) याशिवाय सर्वांनी संयम पाळावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. “आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करुन, तो लवकरात लवकर निकाली काढू. अनेकदा खटला लांब चालतो.निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. मी तसं होऊ देणार नाही, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray on Hinganghat Burn Victim Teacher Death )
सर्वांनी धीर धरा. जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा लवकरात लवकर सिद्ध करून पीडितेच्या हत्याऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्थिर बसणार नाही. सर्वांच्या भावनेशी मी सहमत आहे. अशा घटनेला थारा नाही आणि आरोपींना दया माया दाखवली जाणार नाही. या सर्वांचा पाठपुरावा करू. निकाल लागल्यावर अंमलबजावणीसाठी मी उशीर होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
हैदराबादसारखा कायदा न करता त्यात बदल करून कायदा कडक करण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी(Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा (Hinganghat Burn Victim Teacher Death) मृत्यू झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल पण, आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
“हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे”, असं अजित पवार, म्हणाले.
पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू (Hinganghat Burn Victim Teacher Death) झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death).
पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं.