सियाचिनची थंडी, सैनिकांवर अंडी हातोड्याने फोडण्याची वेळ

टोमॅटोपासून ते अंडी फोडण्यासाठीही सैनिकांना हातोड्याचा वापर करावा लागत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

सियाचिनची थंडी, सैनिकांवर अंडी हातोड्याने फोडण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jun 08, 2019 | 7:51 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात थंड युद्धक्षेत्र सियाचिन ग्लेशियरवर सध्या रक्त गोठवणारी थंडी आहे. यात भारतीय सैनिकांनी अन्न खाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. समुद्रसपाटीपासून 20 हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचिनमधील जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टोमॅटोपासून ते अंडी फोडण्यासाठीही सैनिकांना हातोड्याचा वापर करावा लागत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

ज्युसची बॉटल दगडासारखी होत आहे. ज्युस पिण्यासाठी अगोदर तर गरम करावं लागतं आणि नंतरच पिता येतं. खाण्यासाठी अंडी पाठवली जातात, पण ही अंडी दगडासारखी कडक होतात. आलू किंवा टोमॅटो फोडण्यासाठीही हातोड्याचा वापर करावा लागतोय. सर्वच पदार्थ गोठल्यामुळे अन्न बनवायचं कसं असा प्रश्न जवानांसमोर आहे. यातून मार्ग काढत हे सैनिक कर्तव्य बजावत आहेत.

या जवानांच्या माहितीनुसार, सियाचिनमध्ये कर्तव्य निभावणं हा कठीण काम आहे. इथे तापमान उणे 40 ते 70 डिग्रीपर्यंत जातं. सर्वसामान्य व्यक्ती सियाचिनमध्ये राहूच शकत नाही. कारण, सियाचिनमध्ये बाराही महिने बर्फाची चादर असते. हे जगातील सर्वात उंच आणि थंड युद्धक्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी नवे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचिनमधील बेसकॅम्पचा दौरा केला होता आणि जवानांशी संवाद साधला होता.

सियाचिनमध्ये आंघोळ करण्यासाठी जवानांना 90 दिवसांची वाट पाहावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी एक बॉडी वॉश बनवण्यात आलाय. पाणीरहित बॉडी वॉशचा वापर करुन आंघोळीचा अनुभव घेता येतो. आता आठवड्यातून दोन वेळा आंघोळ केली जात आहे. या ग्लेशियरच्या एका बाजूला चीन आहे, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर आहे. यामुळे धोरणात्मकदृष्ट्या हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे.

काही वृत्तांनुसार, सियाचिन ग्लेशियरची सुरक्षा करण्यासाठी प्रति दिन सात कोटी रुपये खर्च होतात. सियाचिनच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त सैनिक चौक्या 16 हजार फुटांपेक्षा जास्त अंतरावर आहेत. जवानांसाठी स्वयंपाक बनवणे आणि गरमीसाठी केरोसिनचा वापर केला जातो. बर्फापासून तयार केलेलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. शिवाय स्वयंपाकासाठीही हेच पाणी वापरलं जातं. Video :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.