बाहुबलीच्या दिग्दर्शकाचा आणखी एक सर्वात महागडा चित्रपट, अजय देवगणसोबत शूटिंग सुरु
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटामुळे चर्चेत (Ajay devgan new big budget movie) आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटामुळे चर्चेत (Ajay devgan new big budget movie) आहे. तानाजी चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. त्यानंतर अजय देवगण आता नवा चित्रपट ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून हा देशातील बिग बजेट चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली (Ajay devgan new big budget movie) करणार आहेत.
अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे अजय देवगणच्या करिअरमधील हा 100 वा चित्रपट होता.
#AjayDevgn begins filming for SS Rajamouli’s ambitious venture #RRR today… Stars #JrNTR, #RamCharan and #AliaBhatt. #RRRMovie pic.twitter.com/7NiMrvRt2b
— taran adarsh (@taran_adarsh) January 21, 2020
अजय देवगण लवकरच आता आपल्या नव्या आरआरआर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाची शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली.
या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांच्याही करिअरमधील हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचा 400 कोटी रुपयांचा बजेट आहे. भारतात आतापर्यंतचा सर्वाधिक बिग बजेट चित्रपट आरआरआर असणार आहे.
हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळमसह एकूण 10 भाषेत 30 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्ररटाची कथा दोन भारतीय स्वतंत्रता सेनानी-अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणशिवाय अभिनेत्री आलिया भट्ट, ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरणही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.