टाटाची जबरदस्त कार लवकरच भारतात, किंमत फक्त…
टाटा मोटर्स लवकरच आपली मायक्रो एसयूव्ही H2X कॉन्सेप्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे, असं कंपनीने अधिकृतपणे सांगितले. H2X कॉन्सेप्टची माहिती कंपनीने जिनेवा मोटर शोमध्ये सांगितली होती.
मुंबई : टाटा मोटर्स लवकरच आपली मायक्रो एसयूव्ही H2X कॉन्सेप्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे, असं कंपनीने अधिकृतपणे सांगितले. H2X कॉन्सेप्टची माहिती कंपनीने जिनेवा मोटर शोमध्ये सांगितली. टाटाच्या इतर मॉडल प्रमाणे H2X कॉन्सेप्टलाही इंपॅक्ट 2.0 वर डिझाईन केले आहे. या कारची स्पर्धा महिंद्रा केयूव्ही 100 आणि इग्निससोबत होईल.
H2X कॉन्सेप्टच्या प्रोडक्शन व्हर्जनचे नाव टाटा हॉर्नबिल आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने सात सीटर एसयूव्हीचे कोडनेम H7X ठेवले होते. टाटा मोटर्स अल्ट्रोजला या वर्षी लाँच करणार आहे. तर H2X कॉन्सेप्टला H7X नंतर लाँच केले जाऊ शकते. टाटा मोटर्सने या वर्षी मार्चमध्ये झालेल्या जिनेवा मोटर शोमध्ये H2X कॉन्सेप्टला शोकेस केले.
टाटा H2X कॉन्सेप्टचा फ्रंट टाटा हॅरिअरसारखा दिसतो. विशेष म्हणजे या कारचे ग्रिल डिझाईन आणि हेडलॅम्प हॅरिअरसारखे आहे. H2X कॉन्सेप्टच्या व्हीलबेसची लांबी 2.5 मीटर, रुंदी 1.8 मीटर आणि उंची 1.6 मीटर असेल.
अल्ट्रोजप्रमाणे H2X कॉन्सेप्टलाही इनहाऊस डेवलप अँडवांस मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आले आहे. यामध्ये बीएस-6 उत्सर्जन 1.2 लीटरचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. H2X कॉन्सेप्टला 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटेड मॅन्युअलसह लाँच केले जाऊ शकते.
H2X कॉन्सेप्ट फक्त पेट्रोल व्हेरिअंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. H2X कॉन्सेप्टला पुढच्यावर्षी दिल्लीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये लाँच केले जाऊ शकते. या कारची एक्स शोरुम किंमत 5 ते 8 लाख रुपये असू शकते.