लवकरच ‘तेरे नाम’चा सीक्वल, सलमानच्या जागी कोण?
मुंबई : सलमान खानच्या सुपर हिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना रडवले होते आणि सलमानच्या हेअर स्टाईलनेही वेड लावलं होते. तेरे नाम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. मात्र आता तेरे नाम या चित्रपटाचा आता सीक्वल येत आहे. ‘तेरे नाम’चा सीक्वल येत असल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये या […]
मुंबई : सलमान खानच्या सुपर हिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांना रडवले होते आणि सलमानच्या हेअर स्टाईलनेही वेड लावलं होते. तेरे नाम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. मात्र आता तेरे नाम या चित्रपटाचा आता सीक्वल येत आहे.
‘तेरे नाम’चा सीक्वल येत असल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये या सीक्वलबद्दल उत्सुकता वाढली आहे. जुन्या चित्रपटापेक्षाही नवीन चित्रपट हा दमदार असेल असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट तयार करण्याची जबाबदारी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी घेतली आहे. नवीन चित्रपटातील कथा ही एका गँगस्टारच्या जीवानवर आधारित आहे.
“आता फक्त स्क्रिप्ट तयार झाली आहे. चित्रपटामध्ये एका गँगस्टारची प्रेम कथा दाखवली जाणार आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अजून अभिनेता निवडीवर चर्चा झाली नाही”, असं सतीश कौशिक म्हणाले.
तेरे नाम चित्रपटाचे दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनी केले होते आणि या चित्रपटाची स्क्रिप्ट जैनेंद्र यांनी लिहली होती. सलमानच्या व्यतिरिक्त या चित्रपटात भूमिका चावलाने प्रमुख भूमिकेत काम केले होते. तसेच या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती.