भिवंडीत चार लाखंच्या खंडणी प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेस सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मतलुब अफजल हे गेले वीस वर्षापासून भिवंडी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. खंडणीप्रकरणी मतलुब यांना अटक केली असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. काँग्रेस नगरसेवक मतलुब अफजल […]

भिवंडीत चार लाखंच्या खंडणी प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेस सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मतलुब अफजल हे गेले वीस वर्षापासून भिवंडी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. खंडणीप्रकरणी मतलुब यांना अटक केली असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

काँग्रेस नगरसेवक मतलुब अफजल सरदार यांनी भिंवडी येथील अनधिकृत इमारत नुरी अपार्टमेंट अधिकृत करण्यासाठी बिल्डरकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी पाच लाखांच्या बदली चार लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर मतलुब अफजल यांनी पैशांच्या मागणीसाठी बिल्डर सलिम अब्दुल हफिज अन्सारीकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला.

नगरसेवक मतलुब यांनी दोन टप्प्यात पैसे घेतल्यानंतर उरलेल्या पैशासाठी बिल्डरकडे सतत पैशांची मागणी केली जात होती.  मात्र वैतागलेल्या बिल्डरने पैसे दिल्यावर मोबाईलवरील संभाषणाची ऑडीओ क्लिपचा पुरावा पोलिसांकडे सादर करत नगरसेवक मतलुब यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बिल्डरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सभागृह नेता मतलुब अफझल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या बातमीनंतर शहरातील लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.