राहुल गांधी ‘भारतीय’च, काँग्रेसचा पुरावा सादर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागिरकत्वावर भाजपकडून शंका उपस्थित केली जात आहे. गृह मंत्रालयाने राहुल गांधींना खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या तक्रारीने नोटीस पाठवली. या नोटिशीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी आपल्या नागरिकत्वावर स्पष्टीकरण द्यावे. पुढील 15 दिवसांच्या आत राहुल गांधींना उत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले होते. यावर काँग्रेसने पुरावा देत […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागिरकत्वावर भाजपकडून शंका उपस्थित केली जात आहे. गृह मंत्रालयाने राहुल गांधींना खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या तक्रारीने नोटीस पाठवली. या नोटिशीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी आपल्या नागरिकत्वावर स्पष्टीकरण द्यावे. पुढील 15 दिवसांच्या आत राहुल गांधींना उत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले होते. यावर काँग्रेसने पुरावा देत राहुल गांधीकडे भारताचे नागरिक असल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण देण्यासोबत कागदपत्रही पुराव्यासाठी सरकारसमोर मांडले. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयात पत्र देत दावा केला होता की, राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. त्यांच्या तक्रारीवरुन गृहमंत्रालयातून संचालक बी.सी. जोशी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले.
भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या तक्रारीनुसार, बॅकऑप्स लिमिटेड नावाच्या कंपनीला 2003 मध्ये यूनायटेड किंग्डममध्ये रजिस्टर केले होते. 51 साऊथगेट स्ट्रीट, विंचेस्टर, हॅम्पशर एसओ 23 9ईएच. यामध्ये सचिव आणि संचालकांमध्ये राहुल गांधी यांचे नाव होते.
दरम्यान, काँग्रेसने ते कागदपत्र सार्वजनिक करत, बॅकऑप्स लिमिटेड कंपनीमध्ये राहुल गांधी यांचे नागरिकत्व भारतीय आहे आणि यासोबतच काँग्रेसने सुब्रह्मण्यम स्वामी यांचा दावाही खोडून काढला.