…अन् प्रियांका गांधी खाली उतरून गाडीची काच पुसायला लागल्या

प्रियांका गांधी या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या नवनीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. | Priyanka Gandhi

...अन् प्रियांका गांधी खाली उतरून गाडीची काच पुसायला लागल्या
प्रियांका गांधी या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या नवनीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 7:52 PM

लखनऊ: काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. यामध्ये प्रियांका गांधी त्यांच्या कारमधून खाली उतरून गाडीची विंडस्क्रीन पुसताना दिसत आहेत. (Vehicles in Priyanka Gandhi’s convoy collide in UP’s Hapur)

प्रियांका गांधी या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या नवनीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रामपूरच्या हापूड रोडवर प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. गाड्यांच्या काचांवर धूळ साचल्यामुळे समोरचा रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

‘प्रियांका गांधींनी स्वत:चा चेहरा साफ करावा’

प्रियांका गांधी यांनी शेतकरी कुटुंबीयांची घेतलेली भेट भाजपच्या नेत्यांना फारशी रुचली नाही. त्यामुळे योगी सरकारमधील मंत्री मोहसीन रजा यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्रियांका गांधी यांनी गाडीच्या काचेऐवजी स्वत:चा चेहरा साफ करायला हवा. काँग्रेस शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहे. काँग्रेस पक्ष इतकी वर्षे सत्तेत होता, त्यावेळी शेतकऱ्यांचे शोषण झाले. काँग्रेसने शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि आज तोच पक्ष शेतकऱ्यांच्या घावावर मलम लावण्याचा दिखाऊपणा करत आहे, अशी टीका मोहसीन रजा यांनी केली.

संबंधित बातम्या:

ज्या एका निर्णयानं इंदिरा देशप्रिय झाल्या, तोच निर्णय मोदींनी हळूहळू कसा फिरवला?

Farmer Protest : शेतकऱ्यांच्याविरोधात खिळ्यांची स्ट्रॅटेजी सरकारवर बुमरँग? कायमचे उखाडणार की नव्या ठिकाणी ठोकणार?

“निळू फुलेंच्या भेटीवेळी अनुपम खेर पहिल्यांदा मनातून उतरले, आता…” शेतकरी आंदोलनावरुन मराठी दिग्दर्शकाचा निशाणा

(Vehicles in Priyanka Gandhi’s convoy collide in UP’s Hapur)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.