लखनऊ: काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. यामध्ये प्रियांका गांधी त्यांच्या कारमधून खाली उतरून गाडीची विंडस्क्रीन पुसताना दिसत आहेत. (Vehicles in Priyanka Gandhi’s convoy collide in UP’s Hapur)
प्रियांका गांधी या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या नवनीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रामपूरच्या हापूड रोडवर प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. गाड्यांच्या काचांवर धूळ साचल्यामुळे समोरचा रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
#WATCH Congress’ Priyanka Gandhi Vadra cleaned windshield of her vehicle. Her driver had to stop allegedly due to poor visibility through windshield.
Vehicles in her cavalcade collided with each other on Hapur Road earlier today, on her way to Rampur; no injuries reported. pic.twitter.com/bAeUudOFPw
— ANI (@ANI) February 4, 2021
प्रियांका गांधी यांनी शेतकरी कुटुंबीयांची घेतलेली भेट भाजपच्या नेत्यांना फारशी रुचली नाही. त्यामुळे योगी सरकारमधील मंत्री मोहसीन रजा यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्रियांका गांधी यांनी गाडीच्या काचेऐवजी स्वत:चा चेहरा साफ करायला हवा. काँग्रेस शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहे. काँग्रेस पक्ष इतकी वर्षे सत्तेत होता, त्यावेळी शेतकऱ्यांचे शोषण झाले. काँग्रेसने शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि आज तोच पक्ष शेतकऱ्यांच्या घावावर मलम लावण्याचा दिखाऊपणा करत आहे, अशी टीका मोहसीन रजा यांनी केली.
संबंधित बातम्या:
ज्या एका निर्णयानं इंदिरा देशप्रिय झाल्या, तोच निर्णय मोदींनी हळूहळू कसा फिरवला?
(Vehicles in Priyanka Gandhi’s convoy collide in UP’s Hapur)