कधीकाळी राहुल गांधींशी जोडलेलं नाव, आता पंजाबची सून होणार आमदार अदिती सिंह

उत्तरप्रदेशमधील रायबरेलीच्या काँग्रेस आमदार अदिती सिंह (Congress MLA Aditi Singh marriage) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

कधीकाळी राहुल गांधींशी जोडलेलं नाव, आता पंजाबची सून होणार आमदार अदिती सिंह
Follow us
| Updated on: Nov 17, 2019 | 10:57 AM

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशमधील रायबरेलीच्या काँग्रेस आमदार अदिती सिंह (Congress MLA Aditi Singh marriage) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांचं पंजाबचे आमदार अंगद सैनी यांच्याशी लग्न ठरलं आहे. 21 नोव्हेंबरला नवी दिल्लीत हा लग्न समारंभ होणार आहे. यानंतर दोन दिवसांनी (23 नोव्हेंबर) त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.

अंगद सैनी आणि अदिती सिंह या दोघांच्याही राजकीय प्रवासाला सोबतच सुरुवात झाली. दोघेही 2017 मध्ये आमदार झाले. अंगद सैनी पंजाबमधील शहीद भगत सिंह नगर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तरुण आमदार म्हणून अंगद यांची पंजाबमध्ये ओळख आहे. ते नवांशहर येथून 9 वेळा जिंकून येणाऱ्या दिलबाग सिंह यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.

अदिति सिंह देखील उत्तर प्रदेशमधील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी 2017 मध्ये 90,000 हून अधिक मताधिक्याने रायबरेली सदर येथून विजय मिळवला. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंह यांनी 5 वेळा रायबरेलीचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

अदिती सिंह मध्यंतरीच्या काळातच बऱ्याच चर्चेत राहिल्या. त्यावेळी त्यांचं नाव काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जोडलं गेलं होतं. मात्र, या चर्चा केवळ अफवा असल्याचं स्पष्ट करत अदिती सिंह यांनी हे वृत्त फेटाळलं होतं. तसेच राहुल गांधी हे माझे भाऊ असल्याचं म्हणत गांधी कुटुंबाशी आमचे जुने कौटुंबिक संबंध असल्याचं म्हटलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.