तुम्हालाही प्रवासात उलट्या, चक्कर येते ? मग हे उपाय कराच राव!
प्रवासात होणारी मोशन सिकनेस किंवा उलटी ही अनेकांना त्रासदायक असते. या लेखात आपण या समस्येची कारणे आणि उपाय जाणून घेऊया. हलका आहार, सुरक्षित जागा निवडणे, शुद्ध हवा, वाचन टाळणे आणि काही घरगुती उपचार यांचा समावेश असलेले उपाय यात सांगितले आहेत. तसेच, मोशन सिकनेस आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे हे देखील लक्षात ठेवा.
मोशन सिकनेस ( Motion sickness ) म्हणजेच प्रवास करताना डोकेदुखी, चक्कर येणे, घाम येणे आणि उलट्या होणे अशा समस्या. कार, विमान, ट्रेन किंवा जहाजामधून प्रवास करताना अचानक ही समस्या उद्भवू शकते. उलट्या येणं, मळमळ होणं, गरगरणं या समस्या झाल्यास घाबरू नका. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहेत. हे उपाय केल्यावर तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळू शकतो. परंतु मोशन सिकनेसपासून आराम मिळवण्यासाठी औषधे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
प्रवासात उलट्या होण्याची कारणं
प्रवासा दरम्यान गाड्यांच्या आवाजांमुळे कानाच्या आतल्या भागात बदल होतात. त्यामुळे उलट्या किंवा मळमळ होते. आपल्या डोळ्यांकडून आलेल्या संदेशांचे आणि कानाच्या अंतर्गत संरचनेचे संदेश एकमेकांशी जुळत नाहीत, तेव्हा मेंदूत गोंधळ होतो आणि यामुळे उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.
उलट्या कशा टाळाव्यात?
पूर्वतयारी करा :
मळमळ होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी प्लास्टिक कॅन किंवा मोशन सिकनेस बॅग जवळ ठेवली पाहिजे. तसेच, सुटसुटीत कपडे घालावे. कारण त्यामुळे वायुवेग अधिक चांगला होईल.
सुरक्षित जागेवर बसा
मळमळ कमी होण्यासाठी, बस किंवा कारमध्ये जास्त हलचाल न होणाऱ्या ठिकाणी बसा. उदाहरणार्थ, बसमध्ये मध्यभागी आणि कारमध्ये समोरच्या सीटवर बसा.
वाचन आणि मोबाईल वापर नको
प्रवासात असताना मोबाईल, लॅपटॉप किंवा वाचन टाळा. यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण वाढते.
शुद्ध हवा घ्या
मळमळ जाणवत असल्यास वाहनांच्या खिडक्या उघडून शुद्ध हवा घ्या.
भरपेट जेवू नका
प्रवास सुरू करण्यापूर्वी भरपेट जेवण करणं टाळा. 45 मिनिटे किंवा 1 तास आधी हलका आहार घेणे योग्य ठरेल.
तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा
वरण, तळलेले पदार्थ, मद्यपान, आणि धूम्रपान टाळा.
गंध आणि औषधांचा वापर
तुळशी, लवंग, आंबट लिंबू, इ. गंधयुक्त औषधे मळमळ कमी करण्यास मदत करू शकतात.
वाहनाची गती कमी ठेवा
उलट्या किंवा मळमळ होण्यास सुरवात झाली तर वाहनाची गती कमी करण्याची विनंती करा.