गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 56 हजार 049 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Corona Discharge Patient Maharashtra Update)

गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 8:47 PM

मुंबई : राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. आज राज्यातून 5 हजार 071 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात मुंबईतील सर्वाधिक 4 हजार 242 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 56 हजार 049 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Corona Discharge Patient Maharashtra Update)

महाराष्ट्रात 29 मे रोजी एकाच दिवशी 8 हजार 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. जवळपास 15 दिवसानंतर आता पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

आज डिस्चार्ज झालेल्या 5 हजार 071 रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक 4 हजार 242 रुग्णांचा समावेश आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 39 हजार 976 इतकी झाली आहे. तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 8 हजार 430 इतकी झाली आहे.

आज कुठे किती रुग्ण कोरोनामुक्त?

शहर – आज डिस्चार्ज – (कंसात एकूण कोरोनामुक्त)

  • मुंबई – 4 हजार 242         (39 हजार 976)
  • पुणे –   568                      (8 हजार 430)
  • नाशिक – 100                  (2 हजार 365)
  • औरंगाबाद – 75                (1 हजार 945)
  • कोल्हापूर – 24                  (1 हजार 030)
  • लातूर – 11 –                       (444)
  • अकोला – 22                     (1 हजार 048)
  • नागपूर – 29                      (811)

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के इतका झाला आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. (Corona Discharge Patient Maharashtra Update)

संबंधित बातम्या : 

कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी, नातेवाईकांकडून दारुच्या बाटल्या-मटणाची डिलीव्हरी

बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.