नागपुरात कापूस खरेदी संथगतीनं, विदर्भातील शेतकरी संकटात

| Updated on: May 11, 2020 | 3:57 PM

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीवर (Corona Effect On cotton selling) परिणाम झाला आहे.

नागपुरात कापूस खरेदी संथगतीनं, विदर्भातील शेतकरी संकटात
संग्रहित
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीवर (Corona Effect On cotton selling) परिणाम झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर कापूस खरेदी सुरु झाली. मात्र कासवगतीने होत असलेल्या कापूस खरेदीमुळे नागपूरच नाही, तर संपूर्ण विदर्भातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे. विक्रीअभावी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे.

खरीप पेरणी तोंडावर आली आहे. पण शेतकऱ्यांचा कापूस विकला जात (Corona Effect On cotton selling) नसल्याने पेरणीसाठी बी बियाणं आणि खतं कशी आणायची, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी कापूस खरेदी संथगतीनं सुरु असल्यानं संपूर्ण विदर्भातील शेतकरी संकटात सापडले आहे. एकट्या नागपूर जिल्हयात साधारण 24 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

पण कॉटन फेडरेशनकडे मनुष्यबळ नसल्यानं जिल्हयात रोज 100 ते सव्वाशे गाड्या कापसाची खरेदी होते. याच कासवगतीने सरकारी कापूस खरेदी सुरु राहिली, तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी महिना लागू शकतो. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

याच मागणीसाठी रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डींच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी पारशीवणी तहसील कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी तहसीलदार त्यासोबत जिल्हा सहाय्यक निबंधक यांना पत्र लिहिलं आहे. कापूस खरेदी वेळेत झाली नाही तर अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात (Corona Effect On cotton selling) आहे.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनचा फटका, लाखमोलाची स्ट्रॉबेरी जनावरांना, महाबळेश्वरमधील शेतकरी हवालदिल 

‘शेतकरी-ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल’, लॉकडाऊनचा सर्वात जास्त फायदा धान्य व्यापाऱ्यांना