Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव
कोरोना विषाणूने आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे.
नाशिक : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने (Corona First Death In Nashik ) आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. येथे 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिकच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 7 वर पोहोचली आहे (Corona First Death In Nashik ).
मालेगावातील 6 जणांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले, तर 1 कोरोना निगेटिव्ह आहे. या पाच जणांपैकी एकाचा काल मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत व्यक्ती ही 51 वर्षीय पुरुष असून ती मालेगांवातील रहिवाशी होती. ते दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा कोविड-19 चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. काल बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली. मात्र, मृत्यूनंतर या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. तसेच, नाशकातील हा पहिला कोरोना (Corona First Death In Nashik ) बळी असल्याने चिंताही वाढली आहे.
राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण
कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्राला काहीसा दिलासा, राज्यात कोरोना रुग्णांची बेरीज, मात्र गुणाकार नाही : राजेश टोपेhttps://t.co/4RbbR3f125#RajeshTope #CoronaVirus #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 8, 2020
कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या 676 मुंबईत आहे. तर पुण्यात कोरोनाचे 155 रुग्ण आहेत. “एक जरी रुग्णाची संख्या वाढली, तरी ती आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून काळजी करणारी गोष्ट आहे. 35 ते 40 दिवसाच्या काळात रुग्णांच्या आकडेवारीत एक मोठी उसळी पाहायला मिळते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील 7 ते 8 दिवस आपले प्रयत्न सुरु राहतील. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र, काही रुग्णांना उपचारानंतर घरीही सोडलं जात आहे. ही समाधानाची बाब आहे”, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 56. नागपूर – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 57. मुंबई – 72 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 58. मुंबई – 48 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 59. मुंबई – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 60. मुंबई – 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 7 एप्रिल 61. मुंबई – 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 62. मीरा भाईंदर – 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 63. मुंबई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 64. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 65. पुणे – 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 66. पुणे – 55 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 67. नाशिक – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 68. मुंबई – 59 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 69. कल्याण – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 70. मुंबई – 64 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 71. मुंबई – 46 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 72. मुंबई – 54 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 73. रत्नागिरी – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल 74. पुणे- एकूण 14 रुग्णांचा मृत्यू- 9 एप्रिल 75. मुंबई – एकूण 9 रुग्णांचा मृत्यू – 9 एप्रिल 76. मालेगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल
Corona First Death In Nashik
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |