चीनमधील ‘हुबेई’चे लॉकडाऊन 60 दिवसांनंतर हटवले, नागरिकांच्या साथीने ‘कोरोना’ आटोक्यात

चीनमधील सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयाला हुबेईमधील नागरिकांनी साथ दिली. दोन महिने घरातच राहिल्यामुळे 'कोरोना' आटोक्यात आला. (corona hit Hubei Lock down eased)

चीनमधील 'हुबेई'चे लॉकडाऊन 60 दिवसांनंतर हटवले, नागरिकांच्या साथीने 'कोरोना' आटोक्यात
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 3:54 PM

बीजिंग : ‘कोरोना विषाणू’च्या प्रसाराला जिथून सुरुवात झाली, त्या चीनमधील हुबेई प्रांतातील लॉकडाऊन आज (25 मार्च) हटवण्यात आले. तब्बल 60 दिवसांनंतर या प्रांताचे ‘कुलूप’ काढण्यात आले. मात्र नव्या केसेसमध्ये वाढ झाल्यामुळे इतर प्रांत आपल्या नागरिकांवरील निर्बंध अधिक कडक करतील. (corona hit Hubei Lock down eased)

गेल्या पाच दिवसात हुबेईमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या हुबेई प्रांतात सर्व मेट्रो स्टेशन, बस, रेल्वे स्थानक निर्जंतुक केली गेली. डिसेंबरनंतर पहिल्यांदा म्हणजे 90 दिवसांनी हुबेईकर नागरिक मोकळा श्वास घेतील. परंतु हुबेईची राजधानी वुहानमध्ये 23 जानेवारीला लागलेले टाळे 8 एप्रिलला उघडणार आहे. वुहानमध्ये डिसेंबर अखेरीस कोरोनाची पहिली केस सापडली होती.

कोरोना रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन कसा महत्त्वाचा ठरणार?

चीनमधील सरकारने वेळीच निर्णय घेत कठोरपणे राबवला. त्याला हुबेईमधील नागरिकांनी साथ दिली. दोन महिने घरातच राहण्याचा आदेश त्यांनी पाळला. त्यामुळे ‘कोरोना’ दोन महिन्यात आटोक्यात आला. आजघडीला चीनमध्ये कोविड19 चे फक्त 4 हजार रुग्ण आहेत, तर बळींचा आकडा 3 हजार 280 वर रोखण्यात आला.

इटली, स्पेनमध्ये उलट स्थिती

आता ‘फक्त’ 3 हजार 280 का म्हणायचं, तर इटलीत 70 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फक्त 10-12 दिवसात मृतांचा आकडा सात हजाराच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजे चीनपेक्षा दुप्पट मृत्यू. स्पेनमध्ये 42 हजार रुग्ण असून मृतांचा आकडा तीन हजारावर पोहोचत आहे. फ्रान्स, इराण, अमेरिका, इंग्लंड हे देश कोरोनाग्रस्तांच्या संख्येत फार मागे नाहीत.

आपल्या महाराष्ट्राची, किंबहुना अख्ख्या देशाची इटली, स्पेनसारखी अवस्था होऊ नये, असं वाटत असेल, वुहान किंवा हुबेईसारखं कमी नुकसान व्हावे, असं वाटत असेल, तर 21 दिवस घरी बसायलाच हवं.

(corona hit Hubei Lock down eased)

21 दिवस का?

कोरोना संक्रमण साखळी 21 दिवसांची असते. बहुतेक त्यामुळेच सरकारने 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार संचारबंदीमुळे आपोआपच थेट संपर्कबंदी होईल. त्यामुळे अपेक्षित कोरोनाबाधितांची संख्या 62 टक्क्यांनी कमी होईल. तज्ज्ञांना अपेक्षा आहे की, जास्त गंभीर स्थितीची शक्यताही 89 टक्क्यांनी घटेल. तज्ज्ञांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केलेल्या गणितीय मॉडेलच्या आधारे हे अंदाज व्यक्त केले आहेत.

देशात प्रवेशाच्या वेळी प्रवाशांचं केलेलं स्क्रिनिंग सामूहिक संसर्गाचा धोका तीन दिवस ते तीन आठवड्यांनी लांबवतं. पण सार्वजनिक आरोग्य सेवेची सज्जता आणि समाजाची तयारी यावरही संसर्गावर नियंत्रण अवलंबून असतं.

21 दिवसांचं लॉकडाऊन

देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू करत आहे. जिथे आहात तिथेच राहा, पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतो, असं सांगत केंद्र सरकारने प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश, शहर, गावं यांचं सीमा लॉकडाऊन केल्या आहेत.

चीन, इटली, जर्मनी, अमेरिका यांची आरोग्य यंत्रणा उत्तम आहे, तरीही तिथली परिस्थिती भीषण झाली आहे. त्यामुळे मोठं संकट टाळण्यासाठी घरातून बाहेरच पडू नका, असं आवाहन मोदींनी केलं.

जगात काय स्थिती?

कोरोना व्हायरसने बाधित जगभरातील रुग्णांची संख्या 3 लाख 72 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) आपल्या दैनंदिन कोरोनाव्हायरस आजाराच्या (कोविड -19) अहवालात दिली आहे.

जगभरात 3 लाख 72 हजार 757 जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी बहुतांश म्हणजे 1 लाख 95 हजारांपेक्षा जास्त केसेस युरोपमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. एकूण 16 हजार 231 मृतांपैकी 10 हजारांपेक्षा जास्त मृत्यू युरोपियन प्रदेशात झाले.

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता देश कोरोना व्हायरस साथीच्या आजाराचे नवे केंद्रबिंदू ठरु शकतो, अशी भीती WHO चे प्रवक्ते मार्गारेट हॅरिस यांनी व्यक्त केली होती.

(corona hit Hubei Lock down eased)

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.