नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा 1422 वर

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला (Corona infected Police in Navi Mumbai) आहे.

नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा 1422 वर
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 12:48 PM

नवी मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला (Corona infected Police in Navi Mumbai) आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (प्रशासन) सुरेश मेंगडे यांनी (Corona infected Police in Navi Mumbai) दिली आहे .

काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका आरोपीमुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच सर्वाधिक पोलिसांना बंदोबस्तामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बंदोबस्तमध्ये असणारे पोलीस कर्मचारी लोकांच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, विनाकारण रस्त्यावर नागरिक अशा सगळ्यांसाठी 12 मार्चपासून पोलीस रात्रीचा दिवस करत आहेत. नागरिकांनी बाहेर येऊ नये यासाठी कधी कठोर भूमिका घेत कारवाईच सत्र सुरु आहे. तर कित्येकदा नागरिकांना विनंतीही केली जात आहे.

नियोजन नसल्याने एपीएमसी मार्केट सुरू करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सर्वाधित पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रुग्ण सापडले असून शंभर पेक्षा जास्त रुग्ण फळ, भाजीपला आणि दाना मार्केटमध्ये आहेत. एपीएमसीमुळे कालपर्यंत (21 मे) 548 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्या 1422 वर पोहोचली आहे. यातील 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 548 जणांनी कोरोनवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.