Corona | दिल्लीत कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर, 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली

दिल्लीमध्ये मागील 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली आला आहे. (Corona infection rate Delhi)

Corona | दिल्लीत कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर, 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 11:54 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीमध्येही कोरना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ (Corona infection rate) होत आहे. मात्र, दिल्लीमध्ये मागील 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली आला आहे. (Corona infection rate in Delhi goes upto 8.49 per cent)

सध्या दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.38 टक्क्यांवर आला आहे. दिल्लीत मागील 24 तासांमध्ये 272 भाग कंटेन्मेन्ट झोन असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पाच दिवसांमध्ये मृतांचा आकडा 100 पेक्षा कमी

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्ली सरकारने काही ठोस निर्णय घेतले आहेत. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून बुधवारी पहिल्यांदाच 100 पेक्षा कमी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी एकूण 99 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पाच हजारांच्याही पुढे गेला आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी 24 तासांमध्ये कोरोनाच्या 5246 नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये कारोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 45 हजार 787 वर गेला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 8720 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी एकूण 5361 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत 4 लाख 98 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रोज चार ते पाच हजार कोरोना केसेस समोर येत आहेत. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. ‘इंडिया टुडे’ने मुंबई आणि दिल्लीच्या कोरोना परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची पाच मुख्ये कारणे नमूद केली आहेत. तुलनेत मुंबईने कोरोनावर अत्यंत सुयोनियोजितपणे नियंत्रण आणल्याचंही नमूद केलं आहे.

सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे. (Corona infection rate in Delhi goes upto 8.49 per cent)

संबंधित बातमी :

कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन मृतदेहांना अग्नी दिला, पण आता कोसळली बेकारीची कुऱ्हाड

भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार?, पीएम केअरचा निधी मोफत लसीकरणासाठी वापरणार का? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.