[svt-event title=”राज्यात आज कोरोनाचे 2940 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 44,582 वर” date=”22/05/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजार 582 वर, राज्यात आज 2940 रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 63 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या 1517 वर, राज्यात 857 रुग्णांना डिस्चार्ज, 12 हजार 583 एकूण बरे झालेल्यांची संख्या [/svt-event]
[svt-event title=”मुंबईहून आलेल्या आई-वडील आणि मुलीला उस्मानाबादेत कोरोना” date=”22/05/2020,6:38PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : उस्मानाबादेत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील 2 रुग्ण पॉझिटिव्ह, मुंबई वरुन आलेल्या आई वडील आणि मुलीला कोरोनाची लागण, काल आला होता 6 वर्षीय मुलीचा अहवाल, उस्मानाबादेत रुग्णाचा आकडा 25 पार [/svt-event]
[svt-event title=”एपीएमसीतील आणखी 5 जणांना कोरोना, एकूण रुग्णांची संख्या 550 वर” date=”22/05/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : एपीएमसी मार्केटच्या 5 जणांना कोरोनाची लागण, 2 सुरक्षाकर्मी, 2 एपीएमसी कर्मचारी आणि संपर्कातील एकाला कोरोनाची लागण, स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला रिपोर्ट पोझिटिव्ह, एपीएमसी संबंधित एकूण रुग्णांची संख्या 550 वर, आतापर्यंत 7 जणांना मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील ग्रामीण भागात एसटीसेवा सुरु, सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान एसटी धावणार” date=”22/05/2020,6:33PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : आजपासून नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात एसटी सेवा सुरु, नागपूर शहर रेड झोनमध्ये असल्याने शहरात बसच्या फेऱ्या नाही, तालुका स्तरावर ग्रामीण भागात 114 फेऱ्या, एकूण 18 बसेस ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेत, सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यानच एसटी धावणार [/svt-event]
[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांना कोरोनाची लागण, आकडा 254 वर” date=”22/05/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड : शहरात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण, 11 रुग्ण कोरोनामुक्त, आत्तापर्यंत शहरातील 254 रुग्णांना कोरोनाची लागण, तर शहरातील एकूण 153 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”20 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा, कांदा उत्पादकांचे पंतप्रधानांना पत्र” date=”22/05/2020,6:18PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : कांदा उत्पादकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावात उत्पादन खर्चही निघणं मुश्किल, सरासरी 5 ते 6 रुपये प्रतिकिलोला बाजार भाव, 20 रुपये किलो प्रमाणे खरेदी करत कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची पत्रात मागणी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्याची मोहीम सुरु, राज्यातून 1 लाखाहून अधिक पत्र मोदींना पाठवणार [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील मार्केटयार्डमधील भुसार विभात 25 मेपासून सुरु होणार” date=”22/05/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे मार्केटयार्डमधील भुसार विभाग 25 मे पासून सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरु, फळे भाजीपाला विभागाबाबत मंगळवारी बैठक होऊन त्यानंतर निर्णय घेण्यात येणार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 19 तारखेपासून भुसार विभाग बंद, 25 तारखेपासून नियम अटींचे पालन करुन मार्केटयार्ड मधील भुसार विभाग सुरु होणार
[/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचा 14 वर बळी, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू ” date=”22/05/2020,6:13PM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावतीत कोरोनाचा चौदावा बळी, अमरावती शहरातील पाटीपुरा येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू, अमरावतीत बळींची संख्या 14 वर, अमरावतीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 65 वर, उपचारार्थ दोन रुग्ण नागपूरला हलवले, कोरोनाग्रस्त एकूण रुग्णांची संख्या 141 वर [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात आणखी दोघांना कोरोना, रुग्णांची संख्या 409 वर” date=”22/05/2020,6:13PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 वर, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 298 वर [/svt-event]
[svt-event title=”तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी” date=”22/05/2020,5:56PM” class=”svt-cd-green” ]
तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारीhttps://t.co/ULV8AWxfbF#CoronaInMaharashtra #CoronaVirusUpdates #onion #GoldRate
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”कराड शहर कोरोनामुक्त” date=”22/05/2020,5:54PM” class=”svt-cd-green” ] कराड : कराडकरांसाठी दिलासादायक बातमी, कराड शहर कोरोनामुक्त, कराडमध्ये 7 जण कोरोनामुक्त, 7 जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह, टाळ्यांच्या गजरात रुग्णांना डिस्चार्ज, आजपर्यंत कराडमध्ये 89 कोरोनाबाधित रुग्ण बरे [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरातील कोरोनाबधितांची संख्या 237 वर” date=”22/05/2020,5:51PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या पोहचली 237 वर [/svt-event]
[svt-event date=”22/05/2020,5:45PM” class=”svt-cd-green” ]
कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा, 5 रुपये प्रतिकिलो दर, एक लाख कांदा उत्पादक मोदींना पत्र लिहिणार https://t.co/sXzvFu0pif
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण ” date=”22/05/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावतीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. तर 59 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 141 झाली आहे. तर 13 जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी गेला आहे. [/svt-event]
[svt-event title=”शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशाप्रकारच्या सर्व गरिबांसाठी ५० हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं -देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशाप्रकारच्या सर्व गरिबांसाठी ५० हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं -देवेंद्र फडणवीस https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/BR9A67t9nN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,12:00PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय, त्यांच्याबाबत निर्णय घ्यायला हवा, कोरोनाचे उपचार मोफत व्हायला हवेत, खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन सर्वांवर मोफत उपचार व्हावे -देवेंद्र फडणवीस https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/1uRhLBQKtk
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाहीय, रेशनही केंद्राने पुरवले : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाहीय, रेशनही केंद्राने पुरवले, आता खरिपाचा हंगाम आहे, अजूनही कापूस घरी आहे, पीकं पडून आहेत, शेतकमाल उचलला नाही, शेतकरी हवालदिल आहे, -देवेंद्र फडणवीस https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/M2PV2ZimrV
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV -कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले-देवेंद्र फडणवीस https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/2AF7Ih9ZbY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय – देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/3iQbOUyLDH
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”सर्व महानगरात कोरोनाचा कहर, मात्र राज्य सरकारची तयारी नाही : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,11:55AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – सर्व महानगरात कोरोनाचा कहर, मात्र राज्य सरकारची तयारी नाही, BKC ला सेंटर उभं केलंय पण ते दोन दिवसात भरुन जाईल आणि पाऊस पडला तर या सेंटरचं काय होईल? सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत – देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/mNm09G1tN9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही : देवेंद्र फडणवीस” date=”22/05/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ]
खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही, देशात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण ४ टक्के, महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के – देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/PYQwchNpOL
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग : देवेंद्र फडणवीस ” date=”22/05/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ]
राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काहींना प्रवक्ता करुन सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही – देवेंद्र फडणवीस लाईव्ह pic.twitter.com/YjRzZ1DKo9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”नागपुरात कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 15 दिवसांवर” date=”22/05/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोना रुग्णांचा डबलिंगरेट 15 दिवसांवर गेला आहे. नागपुरात 200 रुग्णांवरुन 400 रुग्णसंख्या व्हायला 15 दिवस लागले आहे. यापूर्वी 100 वरुन 200 रुग्ण व्हायला 11 दिवस लागले होते. आता रुग्ण डबलिंगचा काळ वाढून 15 दिवसांवर गेला आहे. रुग्ण डबलिंगचा काळ वाढल्याने नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. [/svt-event]
[svt-event title=” 31 ऑगस्टपर्यंत ईएमआय पुढे ढकलण्यास सवलत : रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर” date=”22/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]
कर्जाच्या परतफेडीवरील स्थगिती आणखी तीन महिन्यांपर्यंत वाढवली, 31 ऑगस्टपर्यंत ईएमआय पुढे ढकलण्यास सवलत : रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर https://t.co/geObg96uI5 #rbigovernor pic.twitter.com/THlIyMlrpG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 22, 2020
[svt-event title=”जालन्यात पुन्हा 7 नवीन कोरोनाबाधित रुग्ण” date=”22/05/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज पन्हा नवीन 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नुकतेच या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जालन्यात आता कोरोनाबधितांचा आकडा 51 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 26 कोरोना रुग्णांची वाढ” date=”22/05/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] ओरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 26 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1212 वर पोहोचली आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 11 वर ” date=”22/05/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. आष्टी येथील 24 वर्षीय तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरुणी मुंबई येथे शिकत असून 15 मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली होती. दोन दिवसांपासून वर्धेच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल होती. आज या तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूरमध्ये दिवसभरात 46 जणांना कोरोनाची लागण” date=”22/05/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये दिवसभरात 46 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 228 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूरमध्ये आजपासून दुकानं, मार्केट, रिक्षा सेवा सुरु होणार ” date=”22/05/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून दुकानं, मार्केट, रिक्षा सेवा सुरु होणार आहे. जिल्हाअंतर्गत भागात एसटीही धावणार आहे. तसेच सलून व्यवसायाला ही सशर्त परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”मद्यविक्रीतून राज्याला 300 कोटींचा महसूल” date=”22/05/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] मद्यविक्रीतून राज्याच्या महसुलात वाढ झाली आहे. 4 मे पासून 20 मे पर्यत राज्याला मद्यविक्रीतून 300 कोटींचा महसूल मिळाला आहे. मुंबई वगळता राज्याच्या बहुतांश भागात होम डिलिव्हरी सुरु आहे. होम डिलिव्हरीमुळं मद्यविक्रीत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु होणार” date=”22/05/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु होणार आहे. प्रवासी घेऊन जाण्यासाठी लाल परी सज्ज झाली आहे. चालक वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच प्रमुख मार्गावर एसटी धावणार आहे. तर कोरोना रुग्ण असलेल्या पन्हाळा, राधानगरी शाहूवाडी तालुक्यात अद्याप परवानगी मिळालेली नाही. [/svt-event]
[svt-event title=”शहरातील खाजगी रुग्णालयांना आता कोरोना चाचणी सक्तीची” date=”22/05/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] शहरातील खाजगी रुग्णालयांना आता कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. चाचणी केल्याशिवाय रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही. इतर कुठल्याही आजारावर उपचारासाठी आलात तरी चाचणी केली जाणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुणे विभागातून आतापर्यंत एक लाख परप्रांतीय मुळगावी रवाना” date=”22/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] पुणे विभागातून आतापर्यंत एक लाख परप्रांतीय मुळगावी रवाना झाले आहेत. सुमारे 77 रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कामगार, मजुरांना रवाना करण्यात आले आहे. पुणे स्टेशनवरून 50 हजार कामगार, मजुरांना 39 रेल्वेने त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यातील कामगार, मजूर होते. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”22/05/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]