नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ‘कोरोना’शी झुंजणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Corona Package announcement for women)
आठ कोटी 30 लाख कुटुंबांना ‘उज्ज्वला गॅस योजने’ अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. 63 लाख महिला बचत गटांना 10 लाखांऐवजी 20 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्जपुरवठा केला जाणार आहे. याचा लाभ 7 कोटी कुटुंबांना होणार आहे. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळेल.
पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता घेतली जाणार आहे. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. सध्या मिळत असल्याच्या अतिरिक्त हा पुरवठा मिळेल. याशिवाय सोबत एक किलो डाळही मोफत मिळेल.
20 crore Jan Dhan Women account holders covered- Ex gratia amount of Rs 500 per month for the next three months, announces FM Sitharaman https://t.co/R6WaPyuvV5
— ANI (@ANI) March 26, 2020
निर्मला सीतारमन यांच्या महत्त्वाच्या घोषणा (Corona Package announcement for women)
1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
3. देशात कोणही उपाशी राहणार नाही
4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
7. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
8. आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार
9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार
10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा
12. तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रु.सानुग्रह अनुदान
13. दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान
14. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान
15. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर
16. आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलिंडर
17. 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ
18. 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार
(Corona Package announcement for women)