Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा शंभरी पार

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Corona Patient increase Kolhapur) आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा शंभरी पार
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 8:22 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Corona Patient increase Kolhapur) आहे. जिल्ह्यात काल (18 मे) एकाच दिवसात तब्बल 52 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 101 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 52 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली (Corona Patient increase Kolhapur)  आहे.

कोल्हापूरच्या सर्वच तालुक्यात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. काल रात्री 28 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 52 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात काल एका 35 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने जिल्ह्याच्या यंत्रणेची झोप उडाली आहे.

सध्या मुंबई आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या शहरातील अनेक जण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जात आहेत. त्यामुळे तेथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असं म्हटलं जात आहे.

नुकतेच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्रातील नागिरकांना मुंबई, पुण्यातून गावी न जाण्याचे आवाहन केले.

“गावी जाण्याची नितांत गरज आहे का? जर तुम्हाला खरचं जायचं का, गरज आहे का? याचा विचार करा. तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुंबई-पुण्यातून आलेल्यांमुळे डोकेदुखी

दरम्यान मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दोन दिवसात 4 हजार 380 नवे रुग्ण

मुंबई-पुण्यातून कोकणात, प. महाराष्ट्रात जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

Goa Corona | कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 18 नवे रुग्ण

डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.