Virar Corona : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, अर्नाळ्यात कडक निर्बंध
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून विरारमधील अर्नाळा ग्रामपंचायत परिसरात कडक निर्बंध लावण्यात (Corona Patient increase Virar) आले आहेत.
विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून विरारमधील अर्नाळा ग्रामपंचायत परिसरात कडक निर्बंध लावण्यात (Corona Patient increase Virar) आले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा फक्त सुरु राहणार (Corona Patient increase Virar) आहे.
अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत 30 जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.
मागच्या 10 दिवसात अर्नाळा गावात 30 च्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नाळेकर पाडा, कोळीवाडा, बंदरपाडा, एस टी पाडा, हे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र आहेत.
पूर्ण बंद काळात दुकाने सकाळी 7 ते सकाळी 10 असे 2 तासच सम-विषम प्रमाणे चालू राहतील. समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल, क्रिकेट, व्हॅलीबॉल खेळण्यावर ही बंदी राहील. वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी ही माहिती दिली.
संबंधित बातम्या :
‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट
Corona Updates | नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदरचे कोरोना अपडेट्स