Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात सात नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 31 वर

देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच (Corona patient increase in Jalgaon) आहे.

जळगावात सात नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 31 वर
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 10:36 AM

जळगाव : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच (Corona patient increase in Jalgaon) आहे. जिल्ह्यात काल (28 एप्रिल) रात्री पुन्हा 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 31 वर पोहोचली आहे. दरम्यान, 31 रुग्णांपैकी 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी (Corona patient increase in Jalgaon) दिली आहे.

कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी 54 व्यक्तींचे तपासणी अहवाल काल रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 7 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर उर्वरित 47 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधित असलेल्या 7 रुग्णांपैकी 4 रुग्ण अंमळनेरचे असून जळगाव, पाचोर आणि भुसावळच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 31 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचे जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या अंमळनेर शहरात पुन्हा 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे, भुसावळ, पाचोरा आणि जळगाव शहरात देखील नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या शहरांची चिंता वाढली आहे.

जळगावात 26 दिवसांनंतर 2 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जळगावात 4 रुग्ण आढळले आहेत. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला असून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lock Down | ‘मैं समाज का दुश्मन हूं…’, संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून धडा

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.