नागपूर : देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient Increase Nagpur) आहे. नागपुरातही 11 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. दोन महिन्यात पहिल्यांदाच काल (6 मे) एकाच दिवशी 44 रुग्णांची वाढ झाली आहे. या घटनेने नागपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Corona Patient Increase Nagpur) आहे.
नागपूर शहरात रुग्णांचा आकडा 206 वर पोहोचला आहे. काल एकाच दिवशी 44 कोरोना रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपुरात गेल्या सहा दिवसात शहरात 68 रुग्णांची वाढ झाली आहे.
नागपूरमधील पार्वतीनगरमध्ये काल एक रुग्ण आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागपुरातील सात पोलीस कर्माचाऱ्यांना क्वारंटाईन केलं आहे. कारण या मृत कोरोनाबाधित रुग्णाचा काका पोलीस शिपाई आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्यानं सात पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
नागपूरचा रामेश्वरी परिसरही काल सील करण्यात आला आहे. काल या परिसरात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या मृ़त व्यक्तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. या परिसरातील अनेकांना रात्री उशिरा विलगीकरन कक्षात पाठविण्यात आलं आहे. नागपूरच्या कंटेन्मेंट परिसराबाहेर कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
विशेष म्हणजे काल नागपुरात एका पाच वर्षीय मुलीने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत नागपुरात 63 जणांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 16 हजार 758 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3094 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्र नागपूरमध्ये! सतरंजीपुरात शंभरीपार रुग्ण
नागपूरवासियांना दिलासा, रविवारी एकही नवा कोरोनाग्रस्त नाही, 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच