Pune Corona : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 550 रुग्ण

पुणे जिल्ह्यात काल (17 जून) दिवसभरात 550 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले (Corona Patient increase Pune) आहेत.

Pune Corona : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 550 रुग्ण
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 11:00 AM

पुणे : पुणे जिल्ह्यात काल (17 जून) दिवसभरात 550 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले (Corona Patient increase Pune) आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 444 रुग्ण हे पुणे शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 235 वर पोहोचली (Corona Patient increase Pune) आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 15 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 553 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 117 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात आणि मृत्यूदर कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे पुणे खुलं केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा काहीदिवसांपूर्वी आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला होता. त्यासोबत जून अखेर अॅक्टिव्ह रुग्ण 6 हजारांवर जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितलं होते.

पुण्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 9.6 टक्क्यांवरुन 4.66 टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, राज्यातही रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे. राज्यात काल 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Pune Corona Recovery | पुणे विभागात आतापर्यंत 10 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त

Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.