वसई-विरारमध्ये कोरोना कहर वाढताच, रुग्णांची संख्या 89 वर

जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यासोबत देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona patient increase in vasai-virar)  आहे.

वसई-विरारमध्ये कोरोना कहर वाढताच, रुग्णांची संख्या 89 वर
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 3:59 PM

वसई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यासोबत देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona patient increase in vasai-virar)  आहे. वसई-विरारमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज (21 एप्रिल) नव्याने एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता वसई-विरार क्षेत्रात नवा रुग्ण पकडून कोरोना रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. यात 5 जणांचा मृत्यू तर 7 जण कोरोनामुक्त (Corona patient increase in vasai-virar) झाले आहेत.

वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात 31 हॉटस्पॉट झोन झाले असून 30 वार्डात हे विभागलेले आहेत. यामध्ये वसई पश्चिम, वसई गाव, नालासोपारा पूर्व, विरार पश्चिम भागात कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. वसई पश्चिम आनंद नगर, साई नगर, ओम नगर, विना नगर, वसई गाव पापडी, गास, वसई पूर्व एव्हरशाईन, एव्हरशाईन सेक्टर 06, वसंत नगरी, नालासोपारा पूर्व आचोले, तुलिंज, भारत पेंढारी नगर (डॉन लेन), बु-हान नगर, सेन्ट्रलपार्क, प्रगती नगर, रहमत नगर, धणीवबाग, नालासोपारा पश्चिम निलेमोरे गाव, विरार पूर्व जगन्नाथ नगर, फुलपाडा, नारंगी गणपती मंदिर परिसर, विरार पश्चिम गोकुळ टाऊनशीप, एम बी इस्टेट, बोलींज परिसर, आगाशी परिसर, नायगाव पूर्व स्टार सिटी हे हॉटस्पॉट म्हणून घोषीत झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करत आहेत. खोकला, सर्दी, ताप असे लक्षणे आढळलेल्या नागरिकांची माहिती घेत आहे. तसेच एकीकडे वसई विरार महापालिकेसह ग्रामीण भागातही कोरोना रुगणाची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक मात्र याला गांभिर्याने घेताना दिसून येत नाहीत.

शहरातील अनेक रस्त्यावर नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडून फिरत असतानाचे चित्र आहे. पोलीस या नागरिकांवर गुन्हेही दाखल करीत आहेत. संचारबंदीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे अंमलबजावणीमध्ये आतापर्यंत वसई विरारसह संपूर्ण जिल्ह्याक्त 815 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 392 वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून 3600 वाहने जप्त केली आहेत.

कोरोना ही महामारी आहे. एकमेकांच्या संपर्कातुन याचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. पण नागरिकांनी आता प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागणार आहेत.

संंबंधित बातम्या :

वसई, विरार आणि पालघरमध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल मिळणार

Corona Special Report | मुंबईवर कोरोनाचं दृष्टचक्र, वसई-विरार, मीरा-भाईंदरचा कोरोना रिपोर्ट

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.