वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

वाशिम जिल्ह्यात असलेल्या एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आज (24 एप्रिल) निगेटिव्ह आला (Washim corona patient negative) आहे.

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 6:32 PM

वाशिम : वाशिम जिल्ह्यात असलेल्या एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आज (24 एप्रिल) निगेटिव्ह आला (Washim corona patient negative) आहे. 20 आणि 21 व्या दिवसानंतर घेण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने जिल्हातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनमध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनसह इतर सर्वबाबी पहिल्या प्रमाणेच अंमलात राहणार आहेत, असं जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी आज (Washim corona patient negative) सांगितले.

वाशीम जिल्ह्यातील मेडशी येथील 65 वर्षीय रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली होती. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाधित रुग्णाच्या नातेवाईकांसह संपर्कात आलेल्या 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. तसेच कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर संपूर्ण मेडशी गाव सील केलं होते.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली होती. पण या सर्वांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याने जिल्ह्यात एकचं रुग्ण पॉझिटिव्ह होता. यानंतर या रुग्णावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर 14 दिवसाने रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यानंतर आज याच रुग्णाच्या 20 आणि 21 दिवसानंतर करण्यात आलेल्या दोन्ही चाचण्यांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. आरोग्य विभागाला मिळालेल्या या यशा मुळे आज जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे. तर वाशीम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये होणार असल्याने जिल्हावासीयां कडून आनंद व्यक्त होत आहे.

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेला एकमेव रुग्ण 3 एप्रिलला आढळून आला होता. त्यानंतर 18 दिवसात एकही रुग्ण वाढला नाही आहे. यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून संचारबंदीसह जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनाची धास्ती! वाशिममध्ये साखरपुड्यातच लग्न उरकले

वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखी जनजागृती

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.