पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, 35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

गेल्या महिनाभरात पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या सातत्यानं कमी होताना पाहायला मिळत होती. 16 नोव्हेंबरला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 359 रुग्णांची नोंद झाली होती.

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, 35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!
दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट लक्षात घेऊन बसस्थानकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 9:11 AM

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 35 दिवसांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा 1 हजाराहून अधिक कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 1 हजार 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी 1 हजार 20 रुग्ण आढळले होते.(Pune: Corona patients once again started increasing)

गेल्या महिनाभरात पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या सातत्यानं कमी होताना पाहायला मिळत होती. 16 नोव्हेंबरला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 359 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 11 हजार 572 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळत असल्यानं प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 357 रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

पुणे महानगरपालिकेचं ‘सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष

कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘सुपर स्पेडर्स’चा धोका अधिक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं या ‘सुपर स्पेडर्स’वर खरं लक्ष असणार आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल चालक, वेटर आदी सुपर स्प्रेडर्सवर पालिकेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. या सुपर स्प्रेडर्सची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या चाचण्या सुरु होणार आहेत. गेल्या आठ महिन्यातील उपाययोजनांचा फायदा पुणे महापालिकेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होईल, असं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवे दिशानिर्देश

केंद्रीय गृहमंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांना कठोर पाऊल उचलण्याचे निर्देशही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाची नवे दिशानिर्देश

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  • सतत हात धुणे आवश्यक
  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणे महानगरपालिकेचं ‘सुपर स्प्रेडर्स’वर लक्ष

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन

Pune: Corona patients once again started increasing

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.