Corona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले

मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे.

Corona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले
Follow us
| Updated on: Apr 01, 2020 | 7:13 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा गुणाकार दिवसेंदिवस (Corona Patients Update In Pune) वाढतच चालला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे. पुणे विभागातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात कोरोनाबाधित 36 रुग्ण आहेत. तर पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि (Corona Patients Update In Pune) कोल्हापूर 2 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे विभागातून आतापर्यंत 1633 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1,529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1,413 नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर 77 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्यात दोन महिला कोरोनामुक्त

पुण्यातील पहिल्या ‘कोरोना’ रुग्णाच्या मृत्यूनंतर पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली. पुण्यातील दोन कोरोनाग्रस्त महिला ‘कोरोना’मुक्त झाल्या आहेत. महिलांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. यापैकी एक महिला नायडू रुग्णालयात, तर दुसरी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. खाजगी रुग्णालयातील महिला अत्यवस्थ होती, मात्र उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन्ही कोरोनामुक्त महिलांना आज (बुधवार 1 एप्रिल) डिस्चार्ज दिला जाणार आहे.

डिस्चार्ज दिल्यानंतर दोन्ही महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवलं जाणार आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा 30 मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता (Corona Patients Update In Pune). या रुग्णावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्यानंतर पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली होती.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 38 रुग्ण होते, त्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातही 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील 9 जण उपचारानंतर घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167 पुणे – 36 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर – 16 कल्याण – 9 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 9 वसई विरार – 6 यवतमाळ – 4 बुलडाणा – 3 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 318

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च मुंबई – 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 1 एप्रिल पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

Corona Patients Update In Pune

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.